नांदेड दि९: यादव अहिर गवली समाजाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत तुलजेश गुरखुदे यांच्या जय माता दी इलेव्हन नांदेड संघाने सोनू वॉरियर्स जालना संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. मोदी मैदान, मामा चौक, असर्जन येथे पार पडलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि तेलंगणातील एकूण २७ संघांनी सहभाग घेतला.
अंतिम सामना: जय माता दी संघाची प्रभावी कामगिरी
सोनू वॉरियर्स जालना संघाने प्रथम फलंदाजी करताना १० ओव्हर मध्ये ७८ धावा केल्या. याचे प्रत्युत्तर देताना जय माता दी संघाने फक्त पाच गडी गमावून हे लक्ष्य पार करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. एकदम चुरशीच्या या सामन्यात शेवटच्या तीन चेंडू तीन धावा आवश्यक होत्या आणि हे दडपण जय मातादी लीलया पेलले आणि विजयश्री खेचून आणला
सामन्याचे वैशिष्ट्य:
जय माता दी संघाच्या कृष्णा भगत, चेतन भगत आणि हरीश भगत यांनी दमदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
जालन्याचे विनोद भगत यांनी 26 धावांची झुंजार खेळी केली, मात्र त्यांना इतर फलंदाजांची पुरेशी साथ मिळाली नाही.
जय माता दी संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर जालन्याच्या फलंदाजांना मोठी खेळी उभारता आली नाही.
सामन्यानंतर
स्पर्धेतील विजेत्यांना बाबूलाल गणेशलाल यादव यांच्या वतीने ५१,००० रुपयांचे प्रथम पारितोषिक, तर उपविजेत्यांना सुंदरलाल हिरालालजी परीवाले यांच्या वतीने ३१,००० रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
तसेच स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, सुपर फिफ्टी आणि सुपर सिक्स यांसारखी अनेक पुरस्कार देखील समाजातील मान्यवर मानकरी वर्ग व प्रतिष्ठित समाज बांधवांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
सोनू वॉरियर्स संघाने दिला सामाजिक योगदानाचा संदेश
सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत सोनू वॉरियर्स संघाचे कर्णधार विनोद भगत यांनी मिळालेली ३१,००० रुपयांची रक्कम नांदेड येथील सामूहिक विवाह सोहळ्यात कन्यादानासाठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे समाजबांधवांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले.
संघटनांच्या अथक प्रयत्नाने स्पर्धा यशस्वी
या भव्य स्पर्धेचे आयोजन दरवर्षी यादव अहिर गवली समाज, नांदेड यांच्या वतीने करण्यात येते. धीरज यादव, तुलजेश गुरखुदे, विनय रौत्रे, सुंदरलाल परीवाले, डॉ. कैलाश मंडले, दीपक जाफराबादी, विक्रम रौत्रे, शुभम पहाडीये, ईश्वर बटाउवाले आदींनी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
स्पर्धेचा उद्देश तरुणांना खेळाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून देणे, त्यांच्या कौशल्याला चालना देणे आणि समाजात एकतेची भावना निर्माण करणे हा आहे.
ही स्पर्धा भविष्यातही अशाच जल्लोषात पार पडेल आणि युवकांना एक भक्कम मंच उपलब्ध करून देईल, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.
समाजात एकतेची आणि सांघिकतेची भावना निर्माण व्हावी करिता ही स्पर्धा आयोजित केली जाते असे सुंदर भातावाले, ईश्वर रौत्रे, स्वराज बटाउवाले, बिरबल रौत्रे, मोनू गुरखुदे रवीभैय्या परिवाले, सचिन भातावाले, दिलीप मंडले, अभिमन्यू मंडले,साई बटाउवाले, अजय बटाउवाले, आशीष बटाउवाले, हरीश भगत, दर्शन फतेलशकरी, नागेश मंडले,कमलेश मंडले,सचिन खरे, यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कपिल रौत्रे, पवन कोतवाल, ललित बटाउवाले,पवनभैय्या मंडले, यश मंडले, निलेश भातावाले, अजय मंडले, भातेवाले, कैलाश परिवाले, शुभम चौधरी, रोहन कुटल्यावाले, मुकेश कोतवाल, गणेश रौत्रे, रवी परिवाले , अभिजीत भगत, शैलेश लंकाढाई, कार्तिक गुरखुदे, मोतीलाल लंकाढाई, ओम जागंडे, कृष्णा भगत,यदुराज मंडले, कैलास परिवाले आदी सदस्यांनी परिश्रम घेतले
क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अंतिम सामन्याला आणि दोन सेमीफायनल सामन्यांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी उपस्थिती लावली. समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड