- महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे मोठे नुकसान..
हिमायतनगर प्रतिनिधी/-हिमायतनगर शहरातील मुस्लिम बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या ईदगाह मैदानाच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या विरोधात अद्याप कारवाई न केल्याचा मनात राग धरून विद्यमान आमदार जवळगावकर यांच्या कार्य शैलीवर नाराज होऊन शहरातील माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद भाई यांच्या सह पाच नगरसेवकांनी व असंख्य मुस्लिम बांधवांनी दिनांक 9 नोव्हेंबर रोजी बाजार चौक येथे जाहीर कार्यक्रम घेऊन महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांना जाहीर पाठिंबा देऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शहरातील अनेक मुस्लिम समाज बांधव मोठ्या मताने मतदान करून तुम्हाला विजयी करणार असल्याचा बबोलत त्यांना जाहीर पाठिंबा देत त्यांच्या विजयाचा शंखनाद आम्ही करू ग्वाही दिली
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर शहरातील असंख्य मुस्लिम समाज बांधवानी आज पर्यंत काँग्रेस व महाविकास आघाडी च्या मित्र पक्षालाच मतदान केले त्या पक्षांनी सुद्धा मुस्लिम बांधवांना आपली वोट बँक म्हणून समजले आहे पण या उमेदवारांनी ह्याचा गैरफायदा घेऊन आपल्या स्वार्थासाठी मुस्लिम बांधवांची मते बळकावत आलेल्या काँग्रेस पक्षाला आज कंटाळून हिमायतनगर शहराचे मा.उपनगरअध्यक्ष मोहम्मद जाविद गनी यांनी त्यांच्या सह 200 ते 300 मुस्लिम बांधवा सोबत घेऊन त्यांचे सहकारी माजी नगरसेवक प्र.तथा तंटामुक्ती अध्यक्ष अनवर खान पठाण, मा.नगरसेवक प्र.सदाशिव सातव मा.नगरसेवक, प्रभाकर मुधोळकर मा.नगरसेवक अब्दुल खाय्युम,उदय देशपांडे राष्ट्रवादी कांग्रेस शहर अध्यक्ष हिमायतनगर, शेख फेरोज खुरेशी मा.अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष कांग्रेस, शेख सलीम खुरेशी मा.एम् आय एम् तालुका अध्यक्ष, जलील खुरेशी मा. ग्रा.प. सदस्य , सय्यद आदिल मा.कांग्रेस युवा शहर अध्यक्ष सह आदी जनानी गंगाधर पाटील चाभरेकर , गोपाळ भाऊ सारडा, भाजपा तालुका अध्यक्ष गजानन चायल,विकास पाटील देवसरकर, गजानन हरडपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुरावजी कदम कोहळीकर यांना असंख्य मुस्लिम समाज बांधवानी जाहिर पाठीबां देऊन दिनांक 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या हादगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये भरघोस मतदान करू असे सांगत त्यांना पाठिंबा दिला त्यामुळे हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये चित्र बदलाची वारी मोठ्या प्रमाणात वाहताना दिसून येत आहे….