नांदेड दि.१५:येथील नांदेड उत्तर विधानसभेचे अपक्ष उमेदवार श्यामसुंदर शंकरराव जाधव यांनी आपल्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण करत दुसऱ्या फेरीला सुरुवात केली असून त्यांना दोन्हीही फेरीमध्ये मतदारांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे
उच्चविद्या विभूषित, शांत, संयमी, मनमिळावू, समाजाभिमुख स्वभावाचे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास नेहमी तत्पर असणारे श्री. श्यामसुंदर शंकरराव जाधव यांना नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुज्ञ व सुशिक्षित मतदारांचा दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत आहे.
त्यांच्या प्रभागनिहाय प्रचार रॅलींना सर्व स्तरांतील नागरिक व कार्यकर्त्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असून शहारातील आनंद नगर, नाईक नगर, पौर्णिमा नगर, भाग्यनगर, अशोक नगर, हर्ष नगर, टिळक नगर, विद्युत नगर, हनुमानगड, गीता नगर, गांधीनगर या भागातील मतदारांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
चौकट
साधेपणात महानता दाखविणारे नेतृत्व :
कोणत्याही प्रकारच्या भपकेबाजीला थारा न देता, साधेपणाने व प्रामाणिकपणे प्रचार करणारे श्यामसुंदर जाधव हे या मतदारसंघातील तरुण, तडफदार, कर्तबगार उद्योजक आहेत. समाजातील तळागाळातील सर्व घटकांसाठी अहोरात्र झटणारे व ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढणारे एकमेव उमेदवार म्हणून मतदार त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत.
त्यांची निवडणूक निशाणी सोफा आहे या निवडणुकीत, “सोफा” या निशाणीवर प्रचंड बहुमताने विजय मिळवून श्री श्यामसुंदर जाधव यांना विधानसभेत पाठवायचा निर्धार मतदारांनी केला आहे.
कार्यकर्त्यांचा ठाम पाठिंबा असुन त्यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागातही दिसून येत आहे
त्यांच्या पदयात्रेमध्ये शेकडो कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत यात ऍडव्होकेट प्रशांत , सूर्यकर विनोद वंजारे, धनराज पंडित, बालाजी गौळकर, देवकर बाबू भिंगे, मनोज कल्याणकर, राजू सावंत, संजय टेहरे, मनोहर पेरके, सत्यम केंद्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत.
चौकट
श्यामसुंदर शंकरराव जाधव यांची ओळख ही उच्चविद्या विभूषित व शिक्षणाने संपन्न असणारे अभ्यासू नेतृत्व म्हणून आहे ते
मनमिळावू आणि तरुण उमेदवार आहेत समाजाशी जवळीक ठेवून प्रश्न सोडविण्याची मानसिकता. असलेले आणि उद्योजकतेचा अनुभव तसेच विकासाची नवी दृष्टी असलेले सर्व समाजासाठी झटणारे नेतेआहेत ते तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर. असतात
मतदारांनी या ओबीसी उमेदवाराला मोठ्या संख्येने मतदान करून, प्रचंड बहुमताने विजयी करावे आणि नांदेड उत्तर मतदारसंघाचा विकास साधावा असे आवाहन प्रचार फेरी दरम्यान मतदारांना करण्यात येत आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड