तुषार कांबळे : हदगाव प्रतिनिधी
दिनांक : ८ डिसेंबर २०२४
नांदेड जिल्ह्यातील हदगाव-बाळापुर मुख्यमार्गावरील रुई ते निवघा बाजार व चक्री रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, यामुळे या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. यातून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
तसेच या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावल्याने वाहतूकीची कोंडी होत आहे.
हदगाव-बाळापूर हा रस्ता मुख्य नांदेड हिंगोली महामार्गाला जोडत असल्याने या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.
मात्र, या मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हदगावहून बाळापूरच्या दिशेने येताना रुईच्या समोरील कायाधु नदीवरील पूल ओलांडल्यानंतरच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत
तसेच निवघा बाजार समोरील सरकारी विहीर लगत रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठाले खर्डे पडले असल्यामुळे निवघा बाजारला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटुन त्यामध्ये पाईपलाईंच्या गळतीचे पाणी साचल्याने त्या खड्ड्यात रात्रीच्या वेळी वाहने आदळून अपघात होत आहेत
तर दिवसा याठिकाणी वाहनांचा वेग मंदावल्याने वाहतूक कोंडी नेहमीची झाली आहे.
तसेच निवघा बाजार स्मशानभूमी पुढील रस्त्यावरील नुकत्याच बांधलेल्या पुलाची देखील दुरवस्था झाली आहे त्यावर संबधित गुतेदाराने थातूर मातुर मुरूम टाकून डागडुजी केली असल्याने बऱ्याच दुचाकीस्वारांचा या मुरुमावर दुचाकी स्लिप होऊन यामध्ये वाहन चालक जखमी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत
परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व संबधीत गु्तेदार मात्र अद्यापही या रस्त्याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत
या रस्त्याची खरडयामुळे दुरावस्था होऊन दररोज छोटे मोठे अपघात होत असल्याच्या घटना घडत आहेत परंतु तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी अजूनही कुंभकर्ण सारखे झोपेत आहेत
तरी हदगाव हिमायतनगर विधनसभेचे नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम वाहनधारकांच्या या गंभीर समस्या कडे लक्ष देऊन कुंभकर्ण झोपेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आणुन संबंधीत गु्तेदारंकडून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून देऊन वाहनधारकांची होत असलेली हेळसांड थांबवतील का? याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे