हिमायतनगर प्रतिनिधी दि.९: शहरातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते प्रस्तुतीसाठी येणाऱ्या महिलांना सोनोग्राफीची अत्यंत गरज होती त्यामुळे शहरातील रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आमदार माधवराव पाटील यांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा करत ग्रामीण रुग्णालय येथे सोनोग्राफीची मशीन उपलब्ध करून दिली त्या सोनोग्राफी मशीनचा शुभारंभ आज आमदार जवळगावकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
50 बेडच्या नूतन इमारतीची आमदार जवळगावकरांकडून पाहणी.आगामी काळात रुग्णांची गैरसोय होणार नाही असे प्रतिपादन
हिमायतनगर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते विद्यमान आमदार जवळगावकर यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये येथील रुग्णालयाची इमारत उभारून दिली त्यानंतर शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करत या रुग्णालयात अगोदर वीस बेडची मान्यता होती आता ती 50 बेडची मान्यता करत दोन मजली इमारतीचे बांधकाम जवळ जवळ पूर्ण करण्यात आले व येथील रुग्णालयात ऑक्सीजन सेंटर उभारले, एक्सरे मशीन उपलब्ध करून दिली आणि आता या रुग्णालयाच्या गौरवामध्ये त्यांनी रुग्णालयात प्रस्तुतीसाठी येणाऱ्या व गरोदर मातांना सोनोग्राफीची अत्यंत आवश्यकता भासत होती त्यांना सोनोग्राफी करण्यासाठी खाजगी रुग्णालयात जास्त पैसे मोजावे लागत होते त्यामुळे रुग्णांची व माता-पित्यांची गरज लक्षात घेऊन त्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफीच्या माध्यमातून महिलांची मोफत तपासणी झाली पाहिजे यासाठी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा करत ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफीची मशीन उपलब्ध करून दिली त्या सोनोग्राफी मशीनच्या आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी आमदार जवळगावकर यांच्या शुभ हस्ते शुभारंभ संपन्न करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर व्हीं.सी. जाधव वैद्यकीय अधीक्षक हे होते.
यावेळी हिंगोली लोकसभेचे भावी उमेदवार डॉ.अंकुश देवसरकर,तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ.संदेश पोहरे, काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष गजानन सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, समद खान, प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्दन ताडेवाड, चेअरमन गणेशराव शिंदे,दिलीप राठोड, ताडेवाड,काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान, काँग्रेस शहराध्यक्ष संजय माने, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे ,योगेश चिल्कावार,प्रमोद राठोड, डॉ.गणेश कदम,पंडित ढोणे, परमेश्वर गोपतवाड,बाकी सेठ, रमेश धांडे पाटील,सह पत्रकार ज्येष्ठ नागरिक ग्रामीण रुग्णालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते
#सत्यलप्रभा न्युज #नांदेड