ता. प्र.दत्तात्रय सज्जन
धर्माबाददि.६: बाभळी गाव ते बाभळी बंधारा ह्या तीन किलोमीटरच्या वळणदार पण अतिशय उखडलेल्या रस्त्याबाबत केंद्रीय अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत थेट शासनावरच प्रसार माध्यमाच्या समोर ताशेरे ओढल्यामुळे महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टांगल्या गेली आहे.
२८ऑक्टोबर २०१३ साली बाभळी बंधाऱ्याचा लोकार्पण सोहळा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते थाटात पार पडला. यावेळी अनेक आजी-माजी कॅबिनेट व राज्यमंत्री उपस्थित होते. तेव्हापासून एक तप लोटला. सदरील रस्त्यावर अनेकदा निधी आला पण रस्ता अवघ्या एक ते दीड महिन्यात उखडला जातो तर सदरील निधीची विल्हेवाट कोण लावते? यासंदर्भात उलटसुलट चर्चेला वेग आला आहे.
हे एक मार्च रोजी बाबळी बंधाऱ्यातून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ०.६ टीएमसी पाणी सोडावयाचे होते.त्या संदर्भात त्रिसदस्यीय समितीचे अनेक केंद्रीय अधिकारी उपस्थित होते. त्या रस्त्यावरून प्रवास करताना नाकी नऊ येत होते.म्हणून त्यांनी सदरील रस्त्याच्या बाबतीत थेट महाराष्ट्र शासनावरच ताशेरे ओढले आहेत.
उपरोक्त पार्श्वभूमीवर बाभळी गाव ते थेट बंधाऱ्यापर्यंतचा तीन किलोमीटरचा रस्ता तात्काळ सीसी चा व्हावा अशी अपेक्षा परिसरातून व्यक्त होत आहे.
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड