नांदेड दि.३०: भारतातील प्रमुख तीन फौजदारी कायदयांमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. भारतात नव्याने भारतीय न्याय संहिता २०२३ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३व भारतीय साक्ष अधिनियम- २०२३ या प्रमाणे कायदयांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. या तीनही कायदयांना भारत सरकारने अधिसूचना जारी करुन मंजूरी दिली असल्याने १ जुलै, पासून तीनही कायदे संपुर्ण भारतात अंमलात येणार आहेत.
नवीन कायदयांची अंमलबजावणी होणे करीता व जनतेस नवीन कायदयाची माहिती सहजरीत्या प्राप्त होणेकरीता १ जुलै, रोजी नांदेड पोलीस दलाकडून जिल्हयात पोलीस स्टेशन अंतर्गत नवीन कायदयांच्या जनजागृती होणेकरीता विविध कार्यक्रम व बैठकांचे आयोजन करण्यात आलेले आहे. Nanded News
तरी नांदेड जिल्हयातील नागरीकांनी उदईक रोजी आयोजित केलेल्या बैठक व कार्यक्रमांना त्यांचे हद्दीतील पोलीस स्टेशन येथे व नांदेड शहरातील नागरीकांनी सकाळी १०:३० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे मोठ्या प्रमाणात हजर राहून सहभाग नोंदवावा असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे. Nanded Police