माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आज, मंगळवार 11 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मुंबई विभागातून नियमित 325571 विद्यार्थ्यांसह एकूण 342012 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
वाणिज्य शाखेचे सर्वाधिक म्हणजे एक लाख 66 हजार 429 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. त्या खालोखाल विज्ञान शाखेचे 1 लाख 27704 विद्यार्थी आणि कला शाखेचे 47879 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. मुंबईतून 1 लाख 26 हजार 630 विद्यार्थी परीक्षेला बसले असून ठाणे जिल्ह्यातून 1 लाख 15 हजार 484, रायगडमधून 35 हजार 987 आणि पालघर जिल्ह्यातून 63 हजार 220 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. परीक्षेसाठी येताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.