नांदेड दि.२६ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नांदेड लोकसभेचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झालं त्यांच्या निधनामुळे नांदेड जिल्ह्यात मोठी हानी झाली आहे ते काँग्रेसचे निष्ठावंत आणि भाजप विरोधात लढणारे काँग्रेसचे एक ताकदवान नेते त्यांनी केलेले कार्य त्यांच्या निष्ठेची काँग्रेस पक्षाने नोंद घेत त्यांना लोकसभेत संधी दिली होती त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९५४ रोजी झाला त्यांचे वडील बळवंतराव चव्हाण त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले १९८७ साली नायगावचे सरपंच म्हणून निवडून आले त्यानंतर सलग ते २४ वर्ष सरपंच या पदावर होते.१९९० मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाले २००२ मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले २००९ मध्ये अपक्ष आणि २०१४ मध्ये काँग्रेस कडून नायगाव मतदारसंघाचा प्रतिनिधित्व केलं त्यांनी२०२४ मध्ये लोकसभेच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर नांदेड जिल्हा काँग्रेसला मरगळ आली होती. त्या काळात त्यांनी संघर्षाची बाजू घेतली काँग्रेसकडून त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले भाजप तोंडीचा प्रचार यंत्रणे नसताना भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा ५० हजार मतांनी पराभव केला त्यामुळे नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला जीवदान मिळाले होते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसने वसंत चव्हाण नांदेड लोकसभेत उमेदवार म्हणून निवडले दरम्यान भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव करून काँग्रेसचे निष्ठावंत आणि ताकदवान नेता म्हणून आपली छाप निर्माण केली होती काँग्रेसने मोठा निष्ठावंत नेता गमावला त्यांच्या कार्यकाळात त्यांनी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी कामगार आणि सर्वसामान्य जनतेसाठी मोठे योगदान दिले आहे आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून भूषवले होते त्यांचे कार्यकाळात काँग्रेस जिल्ह्याला बळकटी मिळाली होती मात्र त्यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यातल्या राजकारणातील एक सशकत नेतृत्व संपलं.
#सत्यप्रभा न्युज नांदेड