नांदेड दि.८: आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिन पत्रकार दिनानिमित्त आज दि.०८ जानेवारी २०२4रोजी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये स्थायी समिती सभागृह येथे पत्रकारांचा पुष्प व भेट वस्तू देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. महेशकुमार डोईफोडे हे होते.त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पत्रकारांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. वृत्तपत्र, इलेक्टॉनिक्स मिडीयाच्या माध्यमातुन सर्वाचे केळोवेळी योग्य मार्गदर्शन लाभले. आपल्या माध्यामातुन महानगरलिकेपालिकेचे चांगले काम लोकांपर्यंत पोहचले. वृत्तपत्रामुळे समाज घडविण्याचे काम होते. पत्रकारीता लोकशाहीचा चौथा स्थंभ असुन प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम माध्यम करीत असताता असे प्रतिपादन या प्रसंगी आयुक्त महोदयांनी केले आणि सर्व पत्रकार बंधूंना शुभेच्छा दिल्या आहेत
यावेळी मा.आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्री गिरीश कदम, उपआयुक्त(महसूल) डॉ.पंजाब खानसोळे, उपआयुक्त श्री निलेश सुकेवार, सहाय्यक संचालक नगर रचना श्री पवार, शहर अभियंता दिलीप आरसूडे व जनसंपर्क अधिकारी श्री रमेश चवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व पत्रकार बंधुचा पुष्प व भेट वस्तु देउन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माध्यम प्रतिनिधी म्हणुन दै. प्रजावणीचे संपादक श्री गोवर्धनजी बियाणी, श्री मुन्तोजीबोद्दीन, श्री अंकुश सोनसळे व श्री रमेश ठाकुर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी केले.त्यांनी आपल्या भाषणात दर्पण दिवस मराठी भाषेसाठी गौरवशाली दिन असल्याचे सांगुन मा. बाळशास्त्री जांभेकर यांनी खुप मोलाचे कार्य केले असल्याचे सांगितले. पत्रकार हा समाज घडविण्याचे महत्वाचे कार्य करतो असे सांगितले व उपायुक्त डॉ पंजाब खानसोळे यांनी उपस्थीतांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री सुमेध बनसोडे यांनी केले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड