हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- हिंगोली लोकसभेची राजकीय पार्श्वभूमी पाहता यावर्षी महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीचे उमेदवार आहे या दोघांना तगडे आव्हान देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी त्यांच्या समोर जातीय समीकरण दाखवत मोठे आव्हान उभे केले असल्याचे पाहायला मिळत आहे हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीत निर्णायक मतांची उमेदवारांना चिंता लागली असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे आप आपापल्या मताची जुळवा जुळव करण्यासाठी दिनांक 9 एप्रिल रोजी अनेक दिग्गज उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टीकर व महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर व वंचित बहुजन आघाडीचे बि.डी. चव्हाण यांना निवडणूक चिन्ह जाहीर झाले तेव्हापासून या सर्व उमेदवारांनी नांदेड जिल्ह्याचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असलेल्या रेणुका मातेच्या चरणी जाऊन आपल्या प्रचाराची सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे हिंगोली लोकसभे मध्ये हदगाव, कळमनुरी, हिंगोली, वसमत, उमरखेड, व किनवट या विधानसभा मतदारसंघातील तालुक्यात निर्णयात मतांची चिंता या उमेदवारांना लागली आहे मतांची बेरीज जुळत नसल्याने काय करावे लागेल याचा शोध ते घेत आहेत हिंगोली लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो त्याच बरोबर हदगाव हिमायतनगर हा विधानसभा मतदारसंघ सुद्धा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने येथील महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या बाजूने येथील काँग्रेसचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी त्यांची मोठी ताकद त्यांच्या पाठीशी उभी केली आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी असलेले शिंदे गटाचे बाबुराव कदम कोहळीकर यांना मात्र कुठल्याही बड्या राजकीय नेत्याचा मतदारसंघात पाठबळ नसल्याने त्यांना आपली ताकद मतदारसंघात आजमावण्यासाठी व मतांची गोळा बेरीज करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे पण एकीकडे महायुतीचे उमेदवार हा शिवसेनेचा असल्यामुळे सर्व हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी सर्व भाजपाचे कार्यकर्ते मैदानात उतरल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे वेळप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मनधरणी शिवसेनेच्या उमेदवारांना करता आली नाही तर या बाबीचा फटका नक्कीच शिंदे गटाचे उमेदवार यांना बसण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. एकीकडे राजकीय वातावरण पाहता शिवसेनेचे सच्चे कार्यकर्ते जागीच आहेत तर काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यासोबत आपली ही वाट बदललेली आहे अशा बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये विचारांची मते संभ्रम अवस्थेमध्ये गेलेली आहेत हिंगोली लोकसभेच्या बाबतीत दोन्ही उमेदवार शिवसेनेचे असल्यामुळे मतदारांना काय निर्णय घ्यावा हेच अद्याप कळेनासे झाले आहे निष्ठावंत लोकांनी पक्ष बदलला नाही आहे त्याच पक्षाची बाजू भक्कम करण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि एकीकडे शिवसेनेशी दगाफटका करून बंडखोरी करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी महाराष्ट्रात स्त्ता स्थापन केली व येथील विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना अगोदर उमेदवारी देऊन एन वेळी त्यांचा पत्ता कट करून त्यांच्या जागेवर मागील काळात हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवार बाबुराव कदम यांना हिंगोली लोकसभेची उमेदवारी दिली आहे त्यामुळे ज्यांनी पक्ष बदलला आहे त्या नेत्यासोबत काही कार्यकर्ते गेलेले आहेत तर काही कार्यकर्ते अडकून पडले आहेत विचार मग्न स्थितीमुळे अजूनही ते मोकळ्या भावनेने राजकीय मैदानात उतरलेले दिसत नाहीत यामुळे हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात मात्र काही विशिष्ट विचारांची मते निर्णायकरीत्या आपले मत देतील त्यांनी अजूनही आपला कल कळू दिला नसल्याचे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना याची चिंता लागली असल्याचे दिसून येत आहे यासाठी त्या त्या पक्षाचे पुढारी कार्यकर्ते सकाळपासूनच गाठी भेटी घेत मतदारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र मतदार यावेळी आपली भूमिका कळू न देता फक्त माना डोलवत असल्याचे चित्र सध्या मतदारसंघात पाहायला मिळत आहे त्यामुळे हिंगोली लोकसभेमध्ये निवडणुकीचे चित्र कधी पलटणार हे मात्र अद्याप सांगता येत नाही