हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- शहरातील एका अल्पसंख्यांक कुटुंबातील खेळाडू वसीम खान यांना लहानपणा पासूनच रायफल शूटिंगचा छंद होता तो छंद कॉलेज जीवनात त्यांनी आपले ध्येय करून सातत्याने रायफल शूटिंग स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी जिल्हा, राज्य व आता देश पातळीवर आपले नाव कमावत त्यांनी 50 मीटर रायफल शूटिंग मध्ये ६०० पैकी 592.6 गुण घेऊन दुसऱ्यांदा नॅशनल रेनॉल्ट शूटर होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे त्यामुळे दिल्ली येथे झालेल्या 66 व्या राष्ट्रीय नेमबाज चॅम्पियनशिप स्पर्धेत नुकतेच त्यांना रेनॉल्ट शूटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यामुळे त्यांच्यावर हिमायतनगर तालुक्या सह जिल्ह्यातून शुभेच्छानचा वर्षाव होत आहे…
जिद्द व अथक परिश्रमाच्या जोरावर शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन द्रोणाचार्य प्रमाणे ध्येयवेढा होऊन दिनांक 15 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या कालावधीमध्ये दिल्ली येथे झालेल्या ६६ व्या आंतरराष्ट्रीय नेमबाज स्पर्धेमध्ये 50 मीटर प्रोन पुरुष वैयक्तिक स्पर्धेतून हिमायतनगर शहरातील वसीम खान यांनी रायफल शूटिंग या स्पर्धेमध्ये नेत्र दीपक कामगिरी करून गुण मिळवल्यामुळे त्यांना राष्ट्रीय नेमबाज चॅम्पियनशिप स्पर्धेचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे वडील जबी खान , रायफल शूटिंगचे गुरु अहेमद खान ,विकी सिंग मेजर व हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर, काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा प्रसिद्ध व्यापारी रफिक भाई, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड,संदीप पळसिकर, काँग्रेस तालुका अध्यक्ष गजानन सुर्यवंशी,बाकी सेठ, वसीम भाई, हबीब चाऊस, अमर चाऊस, माणिक देशमुख तरोडेकर, हुसेन पैलवान सह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी व पत्रकार बांधवांनी वसीम खान यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…