हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- हिमायतनगर शहरातील हुतात्मा जयंतराव पाटील विद्यालयाचे प्राध्यापक अमोल मोतेवार यांचे चिरंजीव वेदांत अमोल मोतेवार यांनी नुकतीच नीट ची परीक्षा दिली होती त्या परीक्षेमध्ये 720 पैकी 673 गुण घेऊन घवघवीत यश मिळवले या यशाबद्दल वेदांत मोतेवारचे सर्व स्तरातून कौतुक होताना पाहायला मिळत आहे….
याबाबत सविस्तर वृत्त असे की कोरोना महामारीत अनेक लोकांचे प्राण वाचणारे डॉक्टर होते. ते पाहून आपल्याला देखील डॉक्टर होण्याची प्रेरणा आई वडिलांन कडून मिळाली असे वैदांतने सांगितले त्यामुळे डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून बारावी झाल्यानंतर वैदांतने नीटची तयारी सुरू केली होती वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात अवघड परीक्षा देण्यासाठी त्याचे वडील अमोल मोतेवार व आईचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेले त डॉकटर होण्यासाठी वेदांतला त्याच्या शिक्षकांचे सुद्धा मार्गदर्शन मिळत गेले त्यानुसार त्याने युट्यूबवरील व्हिडिओ पाहून देखीलअभ्यास केला या कठोर मेहनतीचे फळ वैदांतला मिळाले नुकताच जाहीर झालेल्या नीटच्या परीक्षेत 720 पैकी 673 असे गुण त्याला मिळाले त्यामुळे वेदांच्या या यशाबद्दल हुतात्मा जयंतराव पाटील महाविद्यालयाच्या संचालिका माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांताताई पाटील, हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर ,हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ, विलास वानखेडे,सुभाष बलपेलवार, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, भाजपा तालुका अध्यक्ष गजानन चायल, अनिल दंमकोडंवार, यांच्या सह पत्रकार परमेश्वर गोपतवाड ,प्रकाश जैन, अनिल मादसवार,दत्ता शिराणे,अशोक अनगुलवार अनिल भवरे, सुभाष दारवंडे, नागेश शिंदे ,सोपान बोंपिलवार सह आदी जणांनी वैदांत चे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…