तहसील कार्यालय येथे न्याय हक्कासाठी आमरण उपोषण सुरू केले होते.
हिमायतनगर ता.प्र.नागेश शिंदे दि.२२: शहरातील तहसील कार्यालय येथे १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव येथील गजानन भुरना भूषणवाड यांच्या वडीलाचे नाव बदलून गैर अर्जदार सुभाष बासेवाड यांनी बनावट कागदपत्रे व मतदान राशन कार्ड तयार करून शासनाची दिशाभूल करत त्यांच्या वडिलांचे नाव असलेली शेत जमिनीचे बनावर कागद पत्र वापरून तहसील कार्यालय येथे चुकीचे पुरावे सादर करत जमीन बळकावल्या प्रकरणी गजानन भूषणवाड यांनी मागील पाच ते सहा दिवसापासून तहसील कार्यालयावर आमरण उपोषण करत होते त्यांच्या उपोषणाची तहसील प्रशासनाने दखल घेत लेखी आश्वासनाने त्यांचे उपोषण सोडविले व लवकरच त्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले यावेळी उपोषणकर्त्यांनी तात्काळ संबंधितावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून मला न्याय द्यावा अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव येथील सदन शेतकरी गजानन भुरणा भूषणवाड यांची शेत जमीन सुभाष मारोती बासेवाड यांनी बनावट मतदान ओळखपत्राचे झेरॉक्स व महाराष्ट्र शासन राजपत्र यांची दिशाभूल करून त्यांच्या वडिलांचे व आडनाव बदलून तहसील कार्यालय हिमायतनगर येथील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून चुकीचे पुरावे सादर करत त्यांच्या वडिलांचे बनावट ओळखपत्र व नमुना नंबर ७ फॉर्म भरून त्यांच्या शेतजमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनास वारंवार अर्ज व्यवहार व तक्रारी करून सुद्धा ह्याची शासनाने दखल न घेतल्यामुळे दि.१५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते या अमरण उपोषणाच्या ५ व्या दिवशी तहसील प्रशासनाने दखल घेऊन दिनांक २२ ऑगस्ट रोजी सदरील प्रकरणाची सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सांगून या प्रकरणाचा तात्काळ निर्णय देऊ असे लेखी आश्वासन देऊन संबंधित उपोषण सोडविले यावेळी उपोषणकर्त्यांनी तहसील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सांगितले की शासनाचे दस्तऐवज बनावट पद्धतीने तयार करणाऱ्या गुन्हेगारावर तात्काळ कार्यवाही करून मला न्याय द्यावा व येणाऱ्या काळात असे कृत्य कोणी करणार नाही याची सुद्धा प्रशासनाने काळजी घ्यावी असे यावेळी बोलताना सांगितले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड