
👉🏻 विद्यार्थ्यांनी रांगोळी काढून नागरिकांना दिला मतदान करण्याचा संदेश
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- तालुक्यातील वडगाव येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत गटशिक्षणाधिकारी शिवानंद शिवाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली दि २३ मार्च रोजी स्वीप मतदान जनजागृती उपक्रमांतर्गत शाळेच्या विद्यार्थ्यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार नागरिकांना रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून आगामी निवडणुकीत मतदान करण्याचा संदेश दिला आहे
या प्रसंगी उपस्थित गटशिक्षणाधिकारी यांनी मतदान जनजागृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या सर्व नागरिक व विद्यार्थ्यांना आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणूकी मध्ये मतदारांना मतदान जनजागृती करण्यासाठी सामूहिक शपथ देऊन मतदान हा घटनेने दिलेला आपल्याला मुलभूत हक्क असून त्याचा आपण योग्य वापर करून नागरिकांनी देशाला बळकट करण्याचे आवाहन हिमायतनगर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिवानंद शिवाचार्य यांनी उपस्थित गावकऱ्यांना केला आहे यावेळी वडगाव येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेमध्ये रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून मतदारांना मतदानाबद्दल प्रमुख मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन करून, गावातून मतदान जागृतीसाठी प्रभात फेरी काढत. चित्रकला निबंध स्पर्धा, नाट्य पथक अशा आदी माध्यमाच्या सहाय्याने मतदान जनजागृती केली यावेळी गटशिक्षणाधिकारी शिवानंद शिवाचार्य, शिक्षण विस्तार अधिकारी अरुण पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख संजय जांणते, बाशेटी सर, केंद्रप्रमुख मुळके मॅडम, ठाकूर सर, डुमणे सर , बोराडे सर सह आदर्श शाळेचे मुख्याध्यापक मारोती गायकवाड सर व गावातील अनेक नागरिक व पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.