👉🏻राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे तालुकाध्यक्ष अभिषेक लूटे यांची मदत व पुनर्वसन मंत्री पाटील यांच्याकडे मागणी ….
हिमायतनगर प्रतिनिधी/- तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे ह्यात तालुक्यातील पळसपुर, डोलारी शिरपल्ली, कोठा तांडा, कामारी दिघी, विर्सनी,धानोरा सह आदी गावातील शेतकरी एन सणासुदीच्या दिवसांत मेटाकुटीला आला आहे या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी तात्काळ जास्तीत जास्त आर्थिक मदत घ्यावी अशी मागणी हिमायतनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजितदादा गट अभिषेक लूटे यांनी एका निवेदनाद्वारे आज दि 9 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे मंत्री पाटील यांच्याकडे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यात ऑगस्ट सप्टेंबर 2024 मध्ये मुसळधार अतिवृष्टी होऊन नदी नाल्यांना मोठा पूर आल्याने नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांच्या पूर्ण जमिनी खरडून जाऊन त्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामध्ये हिमायतनगर सरसम व जवळगाव या तीन मंडळातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन त्यांच्या घरांची सुद्धा पडझड झाली आहे ह्याची महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री यांनी तात्काळ दखल घेऊन हिमायतनगर शहरा सह तालुक्यातील अतिवृष्टी भागातील सर्व लाभार्थ्यांना व शेतकऱ्यांना तात्काळ जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळून द्यावी अशी मागणी आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे नांदेड येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले असताना यांच्याकडे हिमायतनगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अभिषेक अशोकराव लुटे यांनी केली आहे यावेळी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असंख्य पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते….