नांदेड दि.५: मागील अडीच महीन्यापुर्वी हिमायतनगर पोस्टेचे हध्दीत दरोडयाचा गुन्हया घडला होता. या पुर्वी त्या गुन्हयातील दोन आरोपीतास अटक करण्यात आले होते. पाहिजे असलेले चार आरोपीतांना अटक करण्याचे आदेश मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी पोनि श्री अमोल भगत, पोस्टे हिमायतनगर यांना दिले होते. त्या पैकी तीन आरोपीताना दिनांक ३ऑगस्ट रोजी अटक करून त्यांचे ताब्यातुन कांही मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर घटनेचे वृत असे की, श्री प्रल्हाद भाऊराव मिरासे, वय ३८ वर्षे, रा. वडगाव खु. ता. हिमायतनगर नांदेड हे दिनांक १७ मे २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास हिमायनगर ते भोकर जाणारे रोडवर सरसम येथील खव्वा सेंटरच्या पुढील वळणावर मोटार सायकने जात असतांना चार इसमांनी फिर्यादीची मोटार सायकल अडवुन त्यंना चाकुचा धाक दाखवुन फिर्यादीचा १२००० /- रू किमतीचा मोबाईल व नगदी १३,००० /-रू दरोडा घालुन. पुढे जाऊन पोटा येथील मनिष आश्रम शाळेच्या गेटसमोर हायवेवर एका मुलाचा १०,०००/- रू चा मोबाईल असा एकुण ३५,०००/-रू चा ऐवज जबरीने हिसकावुन घेऊन पळुन गेले होते. सदर तक्रारीवरून अज्ञात आरोपीतां विरूध्द पोस्टे हिमायतनगर गुरक्र १०८ /२०२४ कलम ३९२, ३४१, ३४ भादवि कायदा प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना गुन्हयात एकुण सहा आरोपीतांचा समोवेश असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयात दरोडयाचे कलम ३९५ भादवि वाढ करण्यात आलेले आहे.
सदर गुन्हयातील अरोपीताचा शोधा करीता आजु बाजुचे पोलीस स्टेशनला माहीती देवुन तपास करीत असतांना दोन आरोपीतांना दिनांक १ जुन २०२४ रोजी अटक करून त्यांचे ताब्यातुन दोन मोबाईल व रोख रक्कम ३.८०० /- रू असा मुद्येमाल या पुर्वी हस्तगत करण्यात आला होता. उर्वरीत चार पाहिजे असलेल्या आरोपीतांचा शोध घेत असतांना गुप्त माहितीच्या आधारे व तांत्रीक पध्दतीने तपास करत असतांना खालील नमुद तीन पाहिजे असलेले आरोपी नामे लखन विनोद पिंपळे, वय २३ वर्षे, रा. विठ्ठलवाडी, हिमायतनगर कुणाल उर्फ लक्की वैजनाथ बोड्डावर, वय २४ वर्षे, रा. दत्तनगर नांदेड विजय तुकाराम अडबलवार, वय २५ वर्षे, रा. तरोडा बु. नांदेड हे बोरघडी रोड व पळसपुर टी पॉईंट, हिमायतनगर या ठिकाणी संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्या ठिकाणी पोलीस पथक पाठवुन त्यांना दिनांक ३ ऑगस्ट २०२४ शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेला एक चाकु व रोख रक्कम ४,२००/- रू हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री खंडेराय धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, मा. श्री डॅनिअल बेन, उपविभागीय पोलीस अधीकारी भोकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन हिमायतनगर पोनि श्री अमोल भगत, मपोउपनि श्रीमती निता कदम, मसपोउपनि कोमल कागणे, पोहेकॉ श्याम नागगरगोजे, पवन चौदते, यांनी अथक परिश्रम घेऊन सदर तीन पाहिजे असलेले आरोपीतांना अटक करून उत्कृष्ट कामगीरी केलेली आहे. वरिष्ठानी त्यांचे अभिनंदन केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड