नांदेड दि.३०: दिनांक २८ जुलै सायंकाळी प्रॉपर हिमायतनगर येथील लकडोबा चौक हनुमान मंदीरात चोरी झाली होती. सदर चोरीचा तपास गतीमान करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस पोनि श्री अमोल भगत, पोस्टे हिमायतनगर यांना दिले होते.
यातील फिर्यादी नामे श्री तुकाराम व्यंकटी मेरगेवाड, वय ५० वर्षे, व्यवसाय शेती रा. ठि. विठ्ठलवाडी हिमायतनगर ता. हिमायतनगर जि. नांदेड यांनी फिर्यादी दिली की, दिनांक २८ जुलै ६ ते ७ वाजता दरम्यान लकडोबा चौक येथील हनुमान मंदीरातुन अहुजा कंपणीचे लाऊड स्पीकरचे अँम्पलीफायर किंमती ४0,000/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेले असल्या बाबत तक्रार दिल्याने पोस्टे हिमायतनगर गुरन १९५/२०२४ कलम ३०५(अ) बीएनस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील अरोपीचा शोधा करीता आजु बाजुचे पोलीस स्टेशनला माहीती देवुन तपास करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, गणेश यादव भालेराव, वय ४८ वर्षे, रा. ठि. शाहु शाळेजवळ, बोरगाव रोड, भोकर यांनी सदर चोरी केल्याची माहिती मिळाली. सदर गुन्हयातील आरोपीचा गुप्त बातमीदाराकडुन संभाव्य ठाव ठिकाणांबाबत माग काढीत असतांना महिती मिळाली की, नमुद आरोपी हा भोकर येथे असल्याचे समजले. सदर आरोपीस भोकर पोलीस स्टेशनचे मदतीने चोवीस तासाचे आत ताब्यात घेतले असुन त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता हनुमान मंदरातील चोरी केल्याचे कबुली दिली. सदर गुन्हयातील चोरीचा मुद्येमाल आहुजा कंपणीचे लाऊडस्पीकरचे अॅम्प्लीफायर किंमती ४०,०००/-रू चे जप्त करण्यात आले आहे. आरोपीस अटक करून एमसीआर करत आहोत.
सदरची कामगीरी मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री खंडेराय धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, मा. श्री डॅनिअल बेन, उपविभागीय पोलीस अधीकारी भोकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन हिमायतनगर पोनि श्री अमोल भगत, मसपोउपनि श्रीमती कोमल कागणे, पोहेकॉ श्याम नागगरगोजे यांनी अथक परिश्रम घेऊन गुन्हा उघडकीस आणुण चांगली कामगीरी केलेली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड