नागेश शिंदे यांच्या पॅनलचे तीन तर इतर एक जणांची निवड
हिमायतनगर ता.प्र नागेश शिंदे दि.२७ नगरपंचायत महाराष्ट्र राज्य पथविक्रेता संघाच्या निवडणुकीत हिमायतनगर येथील पथविक्रेता समिती निवडणूक २०२४ साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता त्या निवडणूक कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते नागेश शिंदे यांनी नगरपंचायत निवडणुकीत एक पॅनल उभे केले होते त्यांच्या पॅनलच्या तीन सदस्यांची आज दि २७ ऑगस्ट रोजी बिनविरोध निवड करण्यात आली आहे त्याबद्दल नगरपंचायतीचे मुख्याधिकारी रणदिवे साहेब यांनी यावेळी नागेश शिंदे यांचे विशेष आभार व्यक्त केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की नगर पंचायत पथविक्रेता समितीच्या ८ जागे साठी निवडणूक घेण्यात आली होती त्यासाठी ५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज पडताळणीच्या शेवटच्या दिवशी एकाचा अर्ज बाद झाला त्यामुळे इतर चार जणांच्या निवडीच्या जागेसाठी नगर पंचायत प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया राबविली त्यात आज दि २७ ऑगस्ट रोजी नागेश शिंदे यांच्या पॅनलचे तीन तर इतर एका उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.दरम्यान सर्वसाधारण महिला, इतर मागास प्रवर्ग, अल्पसंख्यांक प्रवर्ग महिला, विकलांग प्रवर्ग महिला उमेदवारांचा अर्जच आला नाही त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आज या चार उमेदवारांची बिनविरोध निवड केली आहे या उमेदवारांनी येणाऱ्या काळात शहरातील फेरीवाल्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने नगर पथविक्रेता समितीवर ह्यांची निवड केली आहे.त्यात सय्यद नयुम सय्यद खुदुस ( सर्वसाधारण )पंडित देविदास ढोणे ( सर्वसाधारण) पोतन्ना लक्ष्मण पिटलेवाड (ST) अशोक अबादास तवरे(SC) यांची हिमायतनगर नगर पंचायत पथविक्रेता समितीवर बिनविरोध निवड झाल्याचे प्रमाणपत्र देऊन त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी सन्मानित केले व या सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये नगरपंचायतचे कार्यालय अधीक्षक महाजन साहेब, निवडणूक कार्यक्रम अधिकारी बालाजी हरडपकर,मारोती हेंद्रे यांनी काम पाहिले यावेळी नगर पंचायतचे प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद व पत्रकार नागेश शिंदे यांनी सर्व बिनविरोध उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..
यावेळी माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद हाजी अब्दुल गणी ,फेरोज खान,गजानन ताडकुले,गणेश रच्चेवार सह आदी जणांनी नगर पंचायत पथविक्रेता समितीवर बिनविरोध निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…
चौकट:
पॅनल प्रमुख नागेश शिंदे यांचे मुख्याधिकारी यांनी विशेष आभार मानले
हिमायतनगर नगरपंचायत पथविक्रेता समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज दि २७ ऑगस्ट रोजी जाहीर झाल्यानंतर या सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये मोलाचे सहकार्य करणारे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते नागेश शिंदे यांनी नगरपंचायत प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी त्यांचा सत्कार करून विशेष आभार मानले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड