चुकीची झालेली लिलाव पद्धत रद्द करून दोषीवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी… आमदार कोहळीकर विधानसभेत गरजले….
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी नुकतेच सन २०२४ २५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 5 एकर जमिवरील गाळे वाटप लिलावा संदर्भात प्रश्न उपस्थित करून झालेल्या चुकीच्या लिलाव पद्धतीला विरोध करून ती पद्धत तात्काळ रद्द करून संबंधित दोषीवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्राच्या विधानभवनात केली
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचे तत्कालीन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांची एकहाती सत्ता असताना तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालाला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने कधीच हमीभाव मिळवून दिला नाही उलट बिट सुरू करू असे आश्वासन देऊन कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता मिळवली होती मागील १५ जून रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील 106 प्लॉट च्या मोकळ्या जागेवर गाळे बांधकाम करून ते व्यापाऱ्यांना देण्यासाठी लिलाव घेण्यात आला तेव्हा ६ गाळ्यावरून संचालक व व्यापाऱ्यात मोठा राडा झाला होता तेव्हा सर्वसामान्य नागरिकांना कळाले की ही पद्धत चुकीची आहे येथील जागा बेभाव दराने आपल्या मर्जीतील व्यापाऱ्यांना देण्याचा केविलवाना प्रयत्न येथील संचालक मंडळ करीत असल्याचे उघडकीस आले होते त्यामुळे हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी सन २०२४ २५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा पाढा स्पीकर समोर मांडून संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने अनेक नियमाचे उल्लंघन करून आपल्या मर्जीतील लोकांना प्लॉट दिले पुणे पणन संचालक यांनी 22 नोव्हेंबर 2017 च्या निर्देशानुसार प्लॉट वाटप व नोकर भरती मध्ये तीन टक्के आरक्षण ठेवणे अपेक्षित होते हे न करता त्यांनी अनेक नियमांचे उल्लंघन करून झालेल्या गाळे वाटपाची पद्धत चुकीची करून सात कोटी रुपयाचा अपहार करणाऱ्यावर तात्काळ कार्यवाही करून येथील येथील संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली त्यामुळे हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाय वाटपाचा प्रश्न थेट विधानसभेत गाजला असल्याने हिमायतनगर मतदारसंघातील ज्या ज्या व्यापाऱ्यांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलावातील प्लॉटची रजिस्ट्री करून घेतली त्या व्यापाऱ्यांमध्ये चर्चेला उधाण सुटले असल्याचे पाहायला मिळत आहे….