हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- तालुक्यात मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान केले आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील रब्बी हंगामातील पेरण्या पूर्ण होऊन दीड ते दोन महिने झाले असताना त्यांच्या शेतातील हरभरा, कापूस, तूर, गहू ,ज्वारी व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे तर काही भागातील शेतकऱ्यांच्या शेतात हरभरा पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या आहेत त्या शेतकऱ्यावर वातावरणाच्या बदलामुळे दुबार पेरणीचे संकट आले आहे त्या शेतकऱ्यांच्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून त्यांना सरसगट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गजानन तूप्तेवार, डॉ.प्रसाद डोंगरगावकर, तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्या नेतृत्वात हिमायतनगर येथील तहसीलदार यांच्याकडे आज दि 7 डिसेंबर रोजी मागणी करण्यात आली आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर हदगाव तालुक्यात मागील काही दिवसापूर्वी अवकाळी पावसाने झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे संबंधित विभागाच्या अधिकारी व तलाठ्यांनी करून त्याचे प्रस्ताव संबंधित विभागाला पाठवून तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी व येथील शेतकरी बांधवांच्या शेतातील हरभरा व गहू पिके वातावरणाच्या बदलामुळे जळून त्यांच्यावर आळीचे प्रमाण वाढल्यामुळे त्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे त्यामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना हरभरा पिकांची बियाणे मोफत देण्यात यावे या मागणीसाठी दिनांक सात डिसेंबर रोजी हिमायतनगर येथील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेवार, डॉ.प्रसाद डोंगरगावकर ,भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्या नेतृत्वात हिमायतनगर येथील तहसीलदार यांना एक निवेदन देऊन मागणी करण्यात आली यावेळी सोशल मीडिया जिल्हा संयोजक नागेश शिंदे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कल्याण ठाकूर, चिटणीस दुर्गेश मंडोजवार,अभिवक्ता संघाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पंदलवाड ,दत्ता शिराणे, लक्ष्मण ढानके,हिमायतनगर शहर अध्यक्ष विपुल दंडेवाड, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष लक्ष्मण डांगे,शहर अध्यक्ष शीतल सेवनकर , बालाजी तोटेवाड, ओमकार सेवनकर,सोशल मीडियाचे विशाल शिंदे, गजानन पिंपळे,तानाजी सोळंके सह भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येन उपस्थित होते.