नांदेड दि.१६: धर्म रक्षणार्थ व हिंदुत्वाच्या ज्वलंत विचारांचा प्रसार व प्रबोधनासाठी गेल्या ३० -३५ वर्षापासून सातत्याने कार्य करणारे, हिंदुत्ववाद्यांचे अत्यंत जवळचे मित्र म्हणून संकटकाळामध्ये मदत करणारे व खांद्याला खांदा लावून काम करणारे अपक्ष उमेदवार मिलिंद देशमुख यांच्या पाठीशी नांदेड उत्तर विधानसभेतील सर्व जाती- धर्माचे मतदार खंबीरपणे उभी टाकलेली आहे. हिंदुत्वाचा पोशिंदा म्हणून ज्यांनी सातत्याने भूमिका निभावली व संकटसमयी सर्वप्रथम धावून येणाऱ्या मिलिंद भाऊंच्या पाठीशी हिंदुत्ववाद्यांनी उघडपणे पाठीशी राहण्याचे सर्वानुमते ठरविलेले आहे. राजकारणामध्ये अनेक जणांनी हिंदुत्वाच्या नावावर व आम्ही हिंदुत्वाचे रक्षणकर्ते आहोत म्हणून मते मागितली, व्यासपीठावर हिंदुत्वाचा उदो उदो केला परंतु ते कधीही हिंदुत्व अडचणीत आल्यानंतर मदतीसाठी धावून आले नाहीत. धर्म जागरण असो, रामललाच्या अयोध्येतील प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यामध्ये घरोघरी जाऊन अक्षदा वाटप करण्याचा कार्यक्रम असो, श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, धर्म प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यामध्ये नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ते एकमेव नेतृत्व आहेत. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच हिंदुत्वाच्या बाजूने उभा टाकलेला मतदार संघ असल्यामुळे यावेळी संकटाच्या वेळी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी धावून येणाऱ्या उमेदवारासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज निर्माण झालेली असल्याचे विविध कॉर्नर बैठकांमधून पुढे आले आहे.
कोरोना च्या संकटसमयी सुद्धा कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यासाठी व रुग्णांना अत्यावश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा, रक्तपिशव्यांचा पुरवठा, व्हेंटिलेटर व रुग्णांना त्वरित बेड उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केले. अठरापगड जाती-धर्माच्या गरजू लोकांसाठी कधीही फोन केला तरी एका फोनवर तात्काळ धावून येणारे हे सामाजिक बांधिलकी मानणारे नेतृत्व असल्यामुळे त्यांनाच मतदारांनी समर्थन करून मिलिंद भाऊंना निवडून आणू असा निर्धार महिला, जेष्ठ नागरिक, युवक, हिंदुत्ववादी विचारांना मानणारे कार्यकर्ते वेगवेगळ्या बैठकांमधून व्यक्त करत आहेत.
ज्यावेळी शहरांमध्ये गुंड व्यक्तींकडून महाविद्यालयीन विद्यार्थिनींची छेडछाड होते किंवा एकट्यादुकट्या महिलांना त्रास दिला जातो, ज्येष्ठ नागरिकांना त्रास दिला जातो किंवा लव्ह जिहादचा विषय असो सगळ्यात अगोदर धावून येणारे व्यक्तिमत्व म्हणजेच मिलिंदभाऊ देशमुख असल्यामुळे हाच खरा हिंदुत्वाचा पोशिंदा नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून जाणे ही काळाची गरज असल्याचे अनेक जण खाजगीत बोलताना म्हणत आहेत. धर्माच्या रक्षणासाठी व हिंदुत्ववादी विचारांना सातत्याने समर्थन व सहकार्याची भूमिका त्यांनी समाजकारणात व राजकारणात ठेवलेली आहे. हिंदुत्ववाद्यांना ज्यावेळी कोणी त्रास देण्याचा किंवा अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी त्यांच्या पाठीशी एकमेव मिलिंद भाऊ उभे राहतात हा आजपर्यंतचा नांदेड शहराचा इतिहास आहे. त्यामुळे शहरातील नागरिक युवक व महिला यांना त्यांच्या नेतृत्वाविषयी व सामाजिक कार्याविषयी नेहमीच आदर वाटतो.
मिलिंद देशमुख यांच्याकडे नांदेड उत्तरच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन असल्यामुळे व ते तात्काळ मतदारांच्या संपर्कात दिवसाचे सोळा तास उपलब्ध असल्यामुळे नागरिकांच्या कोणत्याही प्रशासकीय समस्या सोडविण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. त्यांच्या पत्नी सौ. वैशालीताई देशमुख या नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या नगरसेविका असल्यामुळे त्यांच्या प्रभागामध्ये व नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रभागामध्ये त्यांनी 50 कोटी पेक्षा अधिक विकास निधी खेचून आणला व गुणवत्ता पूर्ण दर्जेदार विकासकामे केली. शहरातील अनेक सांस्कृतिक, सामाजिक चळवळींना त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून मदत केलेली असल्यामुळे धर्म रक्षणार्थ कार्य करणारे अनेक हिंदुत्ववादी विचारांचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहेत. किटली या त्यांच्या निवडणूक चिन्हाच्या समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने विधानसभेत आमदार होण्यासाठी निवडून द्यावे असे आवाहन त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड