विजय पाटील
छत्रपती संभाजीनगर दि :२७ : मित्रासोबतचे फोटो आईने पाहिले. त्यानंतर तिला आणि तिच्या मित्राला तिच्या आई-वडिलांनी चांगलेच खडसावले व यापुढे त्या मित्राशी कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत, असे मुलीला बजावले. मित्राशी बोलण्यास पायबंद घातल्याने संतापलेल्या तरुणीने वडिलांना कॉल करून आता पुन्हा कधीच घरी परतणार नाही, सेव्हन हिल उड्डाणपुलावरून उडी घेऊन आत्महत्या करणार असल्याचे कळवून थेट उड्डाणपुलाच्या मध्यभागावरून खाली उडी मारली. सुदैवाने ती वाचली, पण पाय फ्रॅक्चर झाला, तोंडालाही मार लागला. नागरिकांनी तिला तत्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल केले. ही खळबळजनक घटना मंगळवारी (२६ नोव्हेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास घडली.
नक्की काय घडले?
२१ वर्षीय तरुणी शहराबाहेरील बी. फार्मसीच्या तृतीय वर्षात शिकते. तिची एका तरुणासोबत मैत्री आहे. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोघांनी २३ नोव्हेंबरला पार्टी केली. दोघांचे पार्टीचे फोटो कुणीतरी तिच्या आईकडे पोहोचवले. ते फोटो पाहून संतापलेल्या आईने मुलीला जाब विचारला. तिच्या वडिलांना फोटो-पार्टी प्रताप कळल्यानंतर त्यांनीही तिला चांगलेच सुनावले. यापुढे त्या मुलासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत, असे बजावले. त्या मुलालाही विचारणा करण्यात आली. त्यावेळी मुलाने यापुढे असे काही होणार नाही, असे सांगून हे प्रकरण तिथेच थांबविण्याची विनंती केली. त्या मुलासोबत तरुणीला बोलण्यास आई-वडिलांनी पायबंद घातला. तिच्या घरचे विरोधात असल्याने त्यानेही बोलणे सोडून दिले. त्यामुळे तरुणी नैराश्यात गेली.
कॉलेजवरून परतताना सेव्हन हिल उड्डाणपूल गाठला…
तरुणी सायंकाळी सातच्या सुमारास कॉलेजवरून परतताना सेव्हन हिल उड्डाणपुलावर आली. तिथून वडिलांना फोन करून आता मी घरी येणार नाही. उड्डाणपुलावरून उडी घेत आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. ते ऐकल्यावर घाबरलेल्या आई-वडिलांनी दुचाकी काढून तातडीने सिडकोसह इतर उड्डाणपुलांवर मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. सेव्हन हिल उड्डाणपुलावर दुचाकीसह मुलगी थांबलेली त्यांनी पाहिले. वडील आल्याचे पाहून तरुणीने थेट उड्डाणपुलाच्या उत्तर बाजूने (एमजीएमकडे जाणारा मार्ग) खाली उडी घेतली.
सुदैवाने सिग्नल लागलेला होता…
तरुणीने उडी मारली तेव्हा सुदैवाने पुलाखाली वाहतूक नव्हती. सिग्नल लागलेला होता. तरुणी पायांवर पडली. यात तिचा पाय फ्रॅक्चर झाला असून, तोंडालाही जबर मार लागला. ती पडल्याचे पाहून उड्डाणपुलाखालील एका दुचाकीस्वार तरुण आणि रिक्षा चालकाने तिला तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच जिन्सी प
तरुणीने उडी मारली तेव्हा सुदैवाने पुलाखाली वाहतूक नव्हती. सिग्नल लागलेला होता. तरुणी पायांवर पडली. यात तिचा पाय फ्रॅक्चर झाला असून, तोंडालाही जबर मार लागला. ती पडल्याचे पाहून उड्डाणपुलाखालील एका दुचाकीस्वार तरुण आणि रिक्षा चालकाने तिला तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पासलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणी व तिच्या वडिलांचा जबाब नोंदवला. घटनेची नोंद जिन्सी पोलिसांनी घेतली आहे
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर