👉 जळगाव येथील अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा देत शासनाकडे समाज बांधवांची मागणी..
हिमायतनगर प्रतिनिधी/-जळगाव जिल्ह्यातील आदिवासी टोकरे कोळी ,महादेव कोळी, मल्हार यांच्या अन्नत्याग उपोषणाला हदगाव हिमायतनगर तालुक्यातील समस्त समाज बांधवांनी जाहीर पाठिंबा देऊन हदगाव हिमायतनगर तालुक्यात प्रलंबित असलेल्या उपविभागीय कार्यालयातील कोळी व महादेव कोळी चे जातीचे प्रमाणपत्र तात्काळ शासनाने द्यावे यासाठी दि 30 ऑक्टोंबर रोजी येथील तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले..
याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील अनेक वर्षापासून कोळी महादेव कोळी ,टोकरे कोळी, मल्हार समाजाला अनुसूचित जमातीच्या हक्कापासून राजकीय दवापोटी वंचित ठेवण्यात आले आहे त्यासाठी समाज बांधवांनी अनेक वेळेस आंदोलन केली तरी शासन ह्याची दखल घेत नाही म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे सलग 21 दिवसापासून अन्नत्याग आमरण उपोषण सुरू आहे त्या अमरन उपोषणास हिमायतनगर तालुक्यातील कोळी महादेव कोळी समाज बांधवांनी जाहीर पाठिंबा देत हदगाव हिमायतनगर उपविभागीय कार्यालय अंतर्गत प्रलंबित असलेल्या कोळी व महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र शासनाने तात्काळ देण्यात यावे यासाठी हिमायतनगर येथील तहसीलदार यांना आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी निवेदन देऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्याकडे महादेव कोळी व कोळी समाज बांधवांच्या जातीच्या प्रमाणपत्राची व जळगाव येथील उपोषणाची शासनाने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाचा अवलंब करू अन्यथा येणाऱ्या काळात शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे…
यावेळी लक्ष्मण जंगेवाड ,रामेश्वर पिटलेवाड, श्याम बमलवाड, बलभीम मुद्दनवाड, गणेश भिमरवाड, संजय बमलवाड, परमेश्वर गपलवाड, रमेश मुद्दनवाड ,नामदेव बोईनवाड, मारोती बोईनवाड, सुरेश वाघमारे ,नारायण साहलवाड, गंगाधर प्रेमलवाड, गजानन सोमेवाड,रमेश मुद्दनवाढ ,मनोज मुद्दनवाड, यांच्या सह असंख्य समाज बांधव उपस्थित होते