- कार्यकर्त्यांची उत्कंठा शिगेला
हिमायतनगर शहरात लागत आहेत कोहळीकरांच्या विजयासाठी लाखोच्या पैजा….
हदगाव हिमायतनगर विधानसभेसाठी बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले या विधानसभेमध्ये तीन लाख मतदार संख्या असल्यामुळे मतदानाची टक्केवारी अंदाजे 64% झाल्याचे समजले तर इतर बॉयलर पेपरच्या मतदारांनी आपला हक्क बजावला आहे मतमोजणीला एक दिवस शिल्लक असल्याने हिमायतनगर शहर ठीक ठिकाणी कार्यकर्त्यांची उत्कंठा शिगेला पोचली आहेत विधानसभेवर कोण विजयी होणार यासाठी ठीक ठिकाणी बाबुराव कदम कोहळीकर यांच्या विजयासाठी पैजा लागत आहेत तर महाविकास आघाडी करून जवळगावकर विजय होणार असा अंदाज कार्यकर्त्यांमधून लावला जात आहे या विधानसभेमध्ये ह्या वेळेस पैशांचा महापुर पाहायला मिळाला त्यामुळे विजय कोणाचा होणार हे अद्याप कळेनासे झाले आहे….
या बाबत सविस्तर वृत्त असे की हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता कार्यकर्त्यांना उत्कंठा लागली की कोण विजयी होणार ह्याची ही निवडणूक अतिशय रंगतदार व ठीक ठिकाणी पैशाचा पाऊस झाल्यामुळे अनेक मतदारांपर्यंत उमेदवारांनी पैसा पोहोचविला त्यामुळे ह्या विधानसभेच्या मतदानाचा टक्का वाढल्याने अनेकांच्या भुवया उंचावले आहेत कधी नव्हे या निवडणुकीत जातीपातीचे राजकारण झाल्याने जातीय समीकरण पाहता या निवडणुकीत महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर विरुद्ध महायुती कडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांची टक्कर पाहायला मिळाली आहे या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली तर दुसरीकडे ओबीसी व लाडक्या बहिणीचे मतदान मात्र निर्णायक भूमिका घेणार असल्याचे समजून येत आहे लाडक्या बहिणीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारास तारू शकतील अशी शक्यता मतदार संघात बोलल्या जात आहे पण जातीय समीकरण पाहता मुस्लिम समाजाचा मोठा गट सुद्धा महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी असल्याचे ह्या निवडणुकीत पाहायला मिळाले त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचे पारडे जड असल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे तर दुसरीकडे विकासाच्या मुद्द्यावर मागील दहा वर्ष हदगाव हिमायतनगर विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे जवळगावकर हे या निवडणुकीत माझाच विजय होणार या दृष्टीने त्यांनी आपल्या विकास कामाची गोडधोड मतदारसंघात सुरू केली होती त्यामुळे ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती झाल्याची शेवटच्या दोन दिवसात पाहायला मिळाली मतमोजणी नंतर विजय कोणाचा होणार याचा फैसला होणार आहे त्यादरम्यान जो तो आमचाच उमेदवार निवडून येणार म्हणून आपले देव पाण्यात घालून बसले आहेत निकालाच्या एक दिवसाआधी मतदानाची आकडेवारी व तज्ञांच्या मते जाणून घेऊन निकालाचे अंदाज ठिकठिकाणी बांधले जात आहेत निवडून कोण येणार यावरून गावागावात ठिकठिकाणी पैजा लागल्या आहेत यात नागरिकासह राजकीय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे पण निवडून कोण येणार हे दिनांक २३ नोव्हेंबर च्या निकालानंतर कळणार आहे.
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड