डॉ. वाकोडे यांच्या इंटरीचा कुणाला होणार फायदा आणि कुणाला तोटा ?
यावेळेस ओबीसीचे मते निर्णायक ठरणार
हिमायतनगर ता.प्र.नागेश शिंदे दि.१३: हदगाव हिमायतनगर विधानसभा ही मागील वीस वर्षांपासून कोणाच्याच कब्जात कायम राहिली नाही यावर कुणाचेच वर्चस्व सध्या दिसून येत नाही त्यामुळे या विधानसभेमध्ये यावेळेस नेतृत्व बदलाचे वारे वाहताना दिसून येत आहे आणि आता तर बहुजनाचे नेतृत्व म्हणून डॉ.शामराव वाकोडे यांच्या इंटरीचा कुणाला फायदा आणि कुणाला तोटा होणार हे पाहणे मात्र महत्त्वाचे ठरणार आहे त्यातच महाविकास आघाडीमध्ये विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर व सौ. डॉ. रेखाताई चव्हाण यांच्यात मोठी स्पर्धा आहे तर महायुतीमध्ये सुद्धा सत्ताधारी भाजपा कडून प्रा.कैलास राठोड,भाजपा जिल्हा सरचिटणीस लताताई फाळके तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बाबुराव कदम कोहळीकर यांच्यात स्पर्धा आहे ,शिवसेना मधील कार्यकर्ते सुद्धा उमेदवारी मिळवण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे या सर्व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जातीय समीकरण पाहता ह्या वेळेस ओबीसी बांधवांचे मते विजयासाठी निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे…
याबाबत सविस्तर वृत्त असे की हदगाव हिमायतनगर विधानसभेचे दहा वर्षे प्रतिनिधित्व केलेले काँग्रेसचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना सुद्धा यावेळेस निवडणूक अवघड जाणार असल्याचे बोलल्या जात आहे मागील 2014 च्या निवडणुकीच्या वेळेस आमदार जवळगावकर यांच्या पराभवाला वंचित बहुजन आघाडीचे डॉ. भुरके कारणीभूत ठरले होते त्यानंतर 2019 च्या विधानसभेमध्ये त्यांनी पुन्हा एकदा या मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचा सत्ताधारी पक्षातील बाबुराव कदम कोहळीकर यांनी पक्षांतर्गत बंडखोरी केल्यामुळे आष्टीकर यांचा पराभव होऊन आमदार जवळगावकर हे निवडून आले होते पण 2024 च्या या विधानसभेचे चित्र मात्र वेगळेच आहे यावेळेस महाविकास आघाडी कडून आमदार जवळगावकर , काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सौ डॉ. रेखाताई चव्हाण , काँग्रेस कमिटीचे हिमायतनगरचे माजी तालुका अध्यक्ष विकास पाटील देवसरकर हे सुध्दा काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षाकडे इच्छुक आहेत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी खासदार सुभाष वानखेडे, शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता ताई पाटील हे सुद्धा इच्छुक आहेत तर दुसरीकडे महायुती मधील शिवसेना भाजप व राष्ट्रवादी कडून हिंगोली लोकसभेमध्ये पराभूत झालेले एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर हे सुद्धा हदगाव हिमायतनगर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळवण्यात आग्रेसर असल्याचे पाहायला मिळत आहे त्यांच्याच मित्र पक्षाकडून म्हणजे भारतीय जनता पार्टी कडून ओबीसी नेते म्हणून प्रा. कैलास राठोड, भाजपा जिल्हा सरचिटणीस लताताई फाळके या सुद्धा उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत तर स्वराज्य पक्षाकडून माधवराव पाटील देवसरकर संस्थापक अध्यक्ष स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड तथा स्वराज्य पक्ष नेते यांनी सुद्धा या मतदारसंघात मागील 19 वर्षापासून सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी शासन दरबारी आवाज उठवत अनेक आंदोलने केली आहेत त्यामुळे ह्यांनी सुद्धा निवडणूक लढविणार असल्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे वेळेस हदगाव हिमायतनगर विधानसभेची निवडणूक मोठी रंगतदार होणार आहे यातच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच नांदेड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ.वाकोडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन हदगाव हिमायतनगर विधानसभेची उमेदवारी जवळ जवळ निश्चित केल्याचे संकेत त्यांनी या भेटी वरून दाखवले आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळेस वंचित बहुजन आघाडी कडून बहुजनांचा चेहरा म्हणून डॉ. वाकोडे व दिलीप राठोड हे नाव अधिकच चर्चेत येत आहेत तर अंध आदिवासी समाजाचे डॉ. वाकोडे यांच्या पाठीशी या मतदारसंघातील ओबीसी ,एसी व आदिवासी समाज असल्यामुळे या मतदारसंघात या बहुजनांचे मताधिक्य मोठ्या संख्येने आहे हा समाज एकजुटीने वाकोडे यांच्या पाठीशी राहिल्यास सत्ताधारी आमदार यांना नक्कीच ते पराजित करू शकतात त्यामुळे वाकोडे यांच्या इंटरीने सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरली असल्याचे सध्या तरी पाहायला मिळत आहे त्यामुळे ही निवडणूक मोठी रंगतदार होणार असल्याची चर्चा सध्या सर्व जिल्ह्यात रंगत आहे.
हदगाव हिमायतनगर विधानसभा पूर्वीपासूनच विशिष्ट पक्षाची कधीच राहिली नाही त्यामुळे या मतदारसंघात जो.तो इच्छुक उमेदवार आपली वचक मतदारांसमोर निर्माण करण्यासाठी मतदारांच्या गाठीभेटी, वास्तुशांती, अंत्यविधी, पूरग्रस्ताचे पाहणी दौरे सह गणेश मंडळांना भेटी देण्यासाठी पुढाकार घेत आहे त्यामुळे यावेळेस मतदार राजा कोणाच्या पाठीमागे राहिल हे मात्र अद्याप सांगता येणार नाही.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड#हिमायतनगर