तुषार कांबळे
हदगाव दि.२८: हदगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीसाठी काल व आज झालेल्या निवडणूक प्रशिक्षणात निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कांबळे उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती पल्लवी टेमकर आदींनी कर्मचाऱ्यास मार्गदर्शन केले दोन दिवस संपन्न झालेल्या प्रशिक्षणात ७३अधिकाऱ्यांनी दांडी मारली काल १५ मतदान केंद्राध्यक्ष तर १३ सहायक मतदान केंद्राध्यक्ष प्रशिक्षणाला गैरहजर राहिले तर आज झालेल्या इतर मतदान अधिकारी ८५८ कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे आदेश देण्यात आले होते यात ८१३ जणांनी उपस्थिती नोंदवली दोन व तीन इतर मतदान अधिकाऱ्यात ४५ इतर मतदान आधिकाऱ्यांनी दांडी मारली आज ९४.७५ टक्के तर काल ९६.५२ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्यात बी.एल.ओ. तसेच निवडणूक कक्षात असलेल्या कर्मचाऱ्यांना वगळून इतरांना नोटीसा बजावून कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कळवले असल्याचे सहायक महसूल अधिकारी किशन गुळगुळे यांनी कळवले असल्याचे मीडिया कक्षातून अनिल तामसकर,अनिल दस्तूरकर यांनी कळवले आहे.
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड