हदगाव प्रतिनिधी / तुषार कांबळे
हदगाव तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी तामसा बाजारपेठ असून येथे गुटखा विक्रीला मोठ्या प्रमाणात उत आला असून या धंद्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यामुळे किशोरवयीन मुलं, मुली या व्यसनाच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होत आहेत. आणि कॅन्सर सारख्या महा भयानक रोगाला आमंत्रण देत आहेत. गुटक्यावर शासनाची बंदी असून सुद्धा अशा अवैध धंदा मोठ्या प्रमाणात तामसा शहरांमध्ये गुटखा विक्री करत आहेत. यामध्ये गुटखा विक्रीदारव्यक्ती हा गुटखा मोठ्या प्रमाणावर विक्री करत असून याला तामसा पोलिसांकडून कुठलीही कारवाई होत नाही. याला पोलीस प्रशासनाचे अर्थपूर्ण सहाय्य आहे काय? असा प्रश्न जनसामान्यातून बोलल्या आहे. हा व्यक्ती
गुटखा मोठ्या प्रमाणात विक्री करून खेड्यापाड्यांमध्ये मोटरसायकली द्वारे पार्सल करत असून यावर पोलीस प्रशासन कारवाई करेल का? करेल तर कधी? असाही प्रश्न जनतेतून बोलल्या जात आहे. व्यसनाधीन मुलं-मुली तसेच कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गुटखा खाऊन नको तिथे थुकून घाणीचे साम्राज्य तयार करीत आहे.याकडे पोलीस प्रशासन लक्ष देईल का? शासन गुटक्यासारख्या अवैध धंदे रोखण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना करीत आहेत परंतु यावर शासनाचे अधिकारीच दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे हल्ली गुटखा हा आंध्र प्रदेशातून येत असून यावर रोख बसेल का? व गुटक्या विक्रेत्यावर कारवाई होईल का? गुटखा विक्री ही प्रामुख्याने किराणा दुकान , पान टपरी व वेगवेगळ्या किराणा दुकानावर व सार्वजनिक ठिकाणी गुटखा विक्री जोमात सुरू आहे. गुटखा विक्रीदार वर कारवाई होईल का? करेल तर कोण? अन्न व प्रशासन विभाग बारकाईने लक्ष देईल का?याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
##सत्यप्रभा न्यूज हदगाव##