पुणे, फेब्रुवारी २०२५ | पुणे, गोवा आणि बेंगळुरूमधील प्रीमियम निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांचे पुरस्कार विजेते निर्माते आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रणी, गेरा डेव्हलपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी अँथनी नेल्सन गोंसाल्वेस यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) म्हणून नियुक्ती केली आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग आणि रिअल इस्टेट डेव्हलपमेंटमध्ये ३० वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या अँथनी यांच्यावर पुण्यातील विविध प्रकल्पांचे नेतृत्व, ऑपरेशनल उत्कृष्टता वाढवणे आणि कंपनीच्या वाढीला चालना देण्याची जबाबदारी असेल.
अँथनी यांनी यापूर्वी डायनामिक्स ग्रुप आणि सायनेर्जी प्रॉपर्टी डेव्हलपमेंट सर्व्हिसेस प्रा. लि. येथे नेतृत्व भूमिका पार पाडली आहे. त्यांच्या उल्लेखनीय प्रकल्पांमध्ये अॅडव्हेंझ टॉवर, दुबई (जो २०१५ मध्ये वर्ल्ड आर्किटेक्चर अवॉर्ड्समध्ये बेस्ट रेसिडेन्शियल टॉवर MENA ठरला) आणि रिव्हिएरा टॉवर, शारजाह यांचा समावेश आहे. त्यांनी दिल्ली, गुरुग्राम आणि मुंबईतील अनेक लक्झरी हाऊसिंग आणि हॉस्पिटॅलिटी प्रकल्प देखील यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत.
नियुक्तीबाबत बोलताना गेरा डेव्हलपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) गुलजार मल्होत्रा म्हणाले, “गेरा टीममध्ये अँथनी गोंसाल्वेस यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांच्या रिअल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शनमधील समृद्ध अनुभवासह प्रोजेक्ट्स हाताळण्याच्या त्यांच्या धोरणात्मक दृष्टिकोनामुळे कंपनीच्या इनोव्हेशन आणि क्वालिटीच्या दृष्टीकोनात मोठी भर पडेल. त्यांच्या नेतृत्वामुळे आमच्या चालू आणि आगामी प्रकल्पांना मोठा फायदा होईल, याचा आम्हाला विश्वास आहे.”
अँथनी हे सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर असून, त्यांनी वायआयटीमधून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी आणि रॉबर्ट गॉर्डन युनिव्हर्सिटीमधून कन्स्ट्रक्शन लॉ आणि आर्बिट्रेशनमध्ये एलएलएम (LLM) पूर्ण केले आहे. जागतिक दर्जाच्या गुणवत्ता, सुरक्षितता, डिझाइन कार्यक्षमता आणि प्रोग्राम मॅनेजमेंटच्या सर्वोत्तम पद्धती राबवण्याचा त्यांचा अनुभव गेराच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ करेल आणि उत्कृष्टतेसाठी असलेली कंपनीची वचनबद्धता अधिक दृढ करेल.
गेरा डेव्हलपमेंट्स सध्या पुण्यात अनेक प्रकल्प विकसित करत असून, आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत आणखी विस्ताराची योजना आहे. कंपनीने तंत्रज्ञानाच्या मदतीने कार्यक्षमतेत सुधारणा करत मोठ्या प्रमाणावर प्रकल्प साकारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेराच्या इनोव्हेशन लॅब – Gera’s iLab द्वारे विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे कंपनीच्या कार्यपद्धतीत सुधारणा होत असून, त्याचा थेट परिणाम व्यवसायाच्या विस्तारावर होणार आहे.
गेरा डेव्हलपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडने नेहमीच उच्च दर्जाचे प्रकल्प साकारण्याचा आणि ग्राहकांच्या विश्वासास पात्र राहण्याचा ध्यास घेतला आहे. अँथनी यांच्या नेतृत्वाखाली, कंपनी उद्योगातील आपली अग्रगण्य भूमिका अधिक मजबूत करेल आणि नाविन्यपूर्ण तसेच ग्राहक-केंद्रित उपाययोजना सादर करेल.