अतिगंभीर डेंग्यू रुग्णावर आव्हानात्मक उपचार डॉ.दुर्गेश साताळकर
नांदेड दि.२०: सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलच्या टिमने आपल्या अचूक निदानातून आणि उपचारातून कौठा परिसरातील शगुन सिटी येथे वास्तव्यास असणाऱ्या ४५ वर्षीय शिक्षिका सौ.लक्ष्मीबाई गोंविदराव बोंदलवाड यांना अतिगंभीर डेग्यूं मधून मुक्तता करून देत त्यांना जिवनदान दिले याबद्दल गुरूवार दि.२० फेब्रुवारी रोजी हॉटेल चंद्रलोक येथील आयोजित पत्रकार परिषेदेत डॉ. दुर्गेश साताळकर यांनी दिली
यावेळी त्यांनी सांगितले की, अतिगंभीर डेंग्यू मध्ये भयंकर तापासोबतच एकाचवेळी किंवा टप्प्याने ईतर शारीरीक अवयव निकामी होण्याच्या धोक्याच्या परिस्थितीतून तरुण रुग्णास मरणाच्या दारातून यशस्वीपणे परत आणत अतिगंभीर परिस्थितीत पोहचलेल्या डेंग्यूवर यशस्वी उपचार करत मोठी ऐतिहासिक कामगिरी पार पाडली आहे अशी माहीती तज्ञ डॉ.दुर्गेश साताळकर व यशोदा हॉस्पिटलच्या टिमच्या वतीने सांगितले
शिक्षिका महीला रुग्ण अति गंभीर अवस्थेत यशोदा हॉस्पिटल येथे दाखल..
सौ.लक्ष्मीबाई गोंविदराव बोंदलवाड या महीला रुग्णांस भयंकर ताप व अशक्तपणासह या लक्षणांसह अतिगंभीर अवस्थेतील डेंग्यू आजारात यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे नोव्हेंबर २०२४ या दरम्यान दाखल करण्यात आले होते, सदरील रुग्णाची प्रकृती इतकी गंभीर होती की तो बेशुद्ध अवस्थेत गेला होता सदरील रुग्णास सुरुवातीला नांदेड येथील स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले होते परंतु परिस्थिी गंभीर झाल्यानंतर सदरील रुग्णास यशोदा हॉस्पिटल येथे आणलेल्या रुग्णाला विलंब न लावता मल्टिसिस्टम इन्व्हॉल्व्हमेंटसह स्कर्व्ह ट्रॉपिकल इन्फेक्शनचे प्रकरण आहे येथील तज्ञ डॉक्टरांनी तातडीने ओळखले.
यशोदा हॉस्पिटल सिंकदराबादच्या टिमच्या ३-४ दिवसांच्या रात्र-दिंवस अशा अथक आयसीयु मधील उपचार व परिश्रमानंतर मध्ये राहिल्यावर रुग्ण सामान्य स्थितीत आल्यानंतर पुढील २ – ३ दिवसाच्या उपचारानंतर रुग्णास सामान्य आयसीयूत आणले त्यावेळी सौ. लक्ष्मी यांच्या फुफ्फुसातील संसर्ग कमी झालेला होता त्याची ऑक्सीजनची आवश्यकता सुधारली होती , प्लेटलेट संख्या व ब्लड प्रेशर स्थिती स्थिर झाली होती आणि इन्फेक्शन पॅरामीटर्स चांगले झाले होते त्यानंतर सर्व प्रकारच्या तपासण्यानंतर शेवटी ८ दिवसांच्या सलग उपचारानंतर आम्ही रुग्णास यशस्वीपणे डिस्चार्ज करू शकलो याचे मोठे समाधान मिळाल्याची भावना डॉ. दुर्गेश साताळकर यांनी बोलून दाखविली ..
चौकट
गंभीर डेंग्यू सौ. लक्ष्मीबाई बोंदलेवाड यांनी मानले डॉक्टरांचे आभार
सौ. लक्ष्मीबाई यांना सहज वाटणाऱ्या तापाच्या आजाराने गंभीर स्वरूप धारण केले त्यावेळी रक्तप्रवाहात गुठळ्या तयार करणाऱ्या पेशींची (प्लेटलेट्स) संख्या कमी होऊन त्या बेशुद्धावस्थेत गेल्या होत्या यावर इंजिनिअर असलेल्या त्यांच्या पतीने तातडीने यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथे हालविले व तेथील संपूर्ण टिमच्या व डॉक्टरांच्या अचूक निदान व उपचार तसेच मानसिक आधारामुळे आपणांस पुर्नजन्म मिळाला असून यशोदा हॉस्पिटलच्या संपूर्ण टिमचे मनापासून आभार व धन्यवाद असे भावुक उद्गार रुग्ण सौ.लक्ष्मीबाई गोविंदराव बोंदलेवाड यांनी काढले
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड