लातूर प्रतिनिधी विजय पाटील दि १८: अहमदपूर तालुक्यातील तेलगाव पाटी येथील श्री दत्त मंदिराच्या कामाचे भूमिपूजन आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. श्री दत्त मंदिराच्या कामासाठी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून २० लाख रुपयांचा निधी मंजूर करुन देण्यात आला आहे. आतापर्यंत अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील सर्वांगीण विकासासाठी विविध
कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी ह.भ.प. कैलास महाराज लिंगदाळकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री दत्त मंदिराच्या विकासकामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार बाबासाहेब पाटील यांचे ग्रामस्थांनी आभार मानत समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी माजी उपसभापती तुकाराम पाटील, इलियास सय्यद, मंदिर कमिटी अध्यक्ष संभाजीराव जाधव, विजयकुमार फुलसे, व्यंकटराव पस्तापुरे, बालाजी बेंबडे, माऊली पाचापुरे, परमेश्वर गुरमे, चंद्रशेखर भालेराव, व्यंकट बेंबडे, पांडुरंग कोकरे, बाळासाहेब बेडदे, देवानंद जाधव, रामराव खिडसे, शिवाजी खिडसे, उमाकांत मंदाडे, साहेबराव जाधव, माधव बेंबडे आदीजण उपस्थितीत होते.
#सत्यप्रभा न्यूज # लातूर