नांदेड दि.२२: माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी आपल्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला.
माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे लोकसभा निवडणूकीत पराभूत झाल्यानंतर पक्ष निरीक्षक म्हणून पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे शनिवारी नांदेड मध्ये असताना त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा भारतीय जनता पार्टीचे उत्तरचे जिल्हाध्यक्ष ऍड किशोर देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला. मागील दहा वर्षात खूप काही शिकता आले कोणतीही कटुता न ठेवता राजीनामा देत असल्याचे पत्रात म्हटले आहे
माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पराभावामुळे भारतीय जनता पार्टीला नांदेड जिल्ह्यात भविष्य नसल्याची शंका असल्याने त्यांनी राजीनामा दिला असावा अशी चर्चा आहे. दरम्यान त्यांनी आपली पुढील भूमिका स्पष्ट केली नसली तरी त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद गटात प्रवेश करतील असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड