हिमायतनगर प्रतिनिधी/- हिंगोली लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक संपली आता प्रतीक्षा मात्र निकालाची लागल्यामुळे निकालाच्या पूर्वसंध्येला हिमायतनगर तालुक्यातील माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांचे विश्वासू तथा युवा सेना तालुका समन्वयक संतोष पुलेवार पोटेकर यांनी आष्टीकर यांच्या विजयासाठी पोटा येथील शंभू महादेव चरणी प्रार्थना करून 21 किलो लाडूचे वाटप करून हा आनंद उत्सव साजरा करणार असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले….
याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील अनेक दिवसांपासून हिंगोली लोकसभेची चर्चा सर्वत्र सुरूआहे या चर्चेला आता दिनांक चार जून रोजी पूर्णविराम म्हणून हिंगोली लोकसभेवर मोठ्या मताधिक्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचा मोठ्या मतांनी विजयी होणार असल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील युवा सेना तालुका समन्वयक संतोष पुलेवार यांनी पोटा येथील शंभू महादेव चरणी प्रार्थना करून अभिषेक करण्यात आला होता त्या अभिषेकाची फल प्राप्ती म्हणून हिंगोली लोकसभेवर गद्दारांना गाडून पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकणार असल्यामुळे हा आनंद उत्सव दि 4 जून रोजी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विजयाने 21 किलो लाडू वाटून तालुक्यात साजरा करणार असल्याची माहिती शिवसैनिक संतोष पुलेवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली