नांदेड दि.२६: भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 74 वा वर्धापन दिन आज सकाळी 8.05 वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये साजरा करण्यात आला मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहण संपन्न झाल्यावर मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत गायले तसेच पोलीस दलाने व अग्निशमन दलाने झेंड्यास सलामी दिली.
तत्पूर्वी आयुक्तांच्या निवासस्थानी सुद्धा ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
ध्वजारोहणानंतर आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या वतीने सर्व अधिकारी व कर्मचारी यांना तंबाखू वापर बंदीची शपथ देण्यात आली.
याप्रसंगी मनपाचे माजी पदाधिकारी व माजी सन्माननीय सदस्य, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त कारभारी दिवेकर, उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे, उपायुक्त निलेश सुंकेवार, मुख्य लेखापरीक्षक तु.ल.भिसे, मुख्य लेखाधिकारी डॉ.जनार्दन पक्वाने, शहर अभियंता दिलीप आरसुडे, कार्यकारी अभियंता रफतुल्ला खान, कार्यकारी अभियंता सुमंत पाटील, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, विधी अधिकारी स.अजितपालसिंग संधू, सहाय्यक आयुक्त संजय जाधव, मो.गुलाम सादेक, स्टेडियम व्यवस्थापक तथा क्षेत्रिय अधिकारी रमेश चौरे, उद्यान अधिक्षक तथा क्षेत्रिय अधिकारी डॉ.मिर्झा फरतुल्ला बेग, क्षेत्रिय अधिकारी रावण सोनसळे, संभाजी काष्टेवाड, निलावती डावरे व अग्निशमन अधिकारी के.जी.दासरे तसेच महापालिकेतील ईतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड