हिमायतनगर प्रतिनिधी/- हदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी मा विकास आघाडी कडून नुकताच विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतर त्यांनी सर्वप्रथम माहूर गडावरील दत्त शिखर संस्थान येथील महंत मधुसूदन भारती यांचे दर्शन घेऊन रेणुका माता चरणी साकडे घालून शुभ आशीर्वाद घेत रेणुका माता मंदिरातही महाआरती करत माहूर शहरातील देव देवेश्वर संस्थानचे दर्शन घेऊन या निवडणुकीत मला यश मिळू दे अशी प्रार्थना करून प्रचाराला सुरुवात केली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होत.
हादगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी महाविकास आघाडी कडून विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळवत मोठे शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन रेणुका मातेचे दर्शन घेत आपला प्रचार सुरू केला माहूर गडावरील दत्तप्रभूचे जन्मस्थान दत्त शिखर संस्थान येथे दत्तप्रभूचे दर्शन घेत महंत मधुसूदन जी भारती यांचे दर्शन घेऊन त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले तसेच श्री रेणुका माता मंदिरात जाऊन आरती करत रेणुका मातेचे दर्शन घेतले तेथील विश्वस्त तथा पुजारी यांनी विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना शुभ आशीर्वाद रुपी तांबूल सह मातेचा प्रसाद दिला यानंतर त्यांनी देव देवेश्वर संस्थान येथे जाऊन भगवान दत्तप्रभूचे निद्रास्थान येथे दर्शन घेतले तसेच महंतांचा आशीर्वाद घेतला त्यामुळे हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत कडवी झुंज होणार असून अनेक कार्यकर्ते कामाला लागले असून निवडणुकीच्या सुरुवातीला विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी श्री दत्तप्रभू श्री रेणुका माता या सर्व धर्मीय देवदेवतांचे शुभ आशीर्वाद घेऊन आपल्या प्रचाराला सुरुवात केली त्यामुळे ही निवडणूक मोठी रंगतदार होणार असल्याचे दिसून येत आहेत…..