हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-तालुक्यातील मौजे सीबदरा येथील ज्येष्ठ नागरिक तथा हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्दन ताडेवाड यांचे वडील स्व. रामचंद्र सोनबा ताडेवाड यांचे आज सकाळी 5 वाजता दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 96 वर्ष होते.
स्व.रामचंद्र सोनबा ताडेवाड यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी 05 वाजता निधन झाले असून, त्यांच्या पार्थिवावर मूळगावी सिबदरा येथे सायं.04 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे. ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्दन ताडेवाड यांचे वडील होते. त्यांच्या मृत्यू पाश्चात्य 5 मूल, तीन मुली, नातू पणतू असा मोठा परिवार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो अश्या शब्दात हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली..