मुंबई : साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादनासाठी बंदी घातली आहे. यासंदर्भातील अधिसूचना सरकारने गुरुवारी जारी केली. अन्न आणि पुरवठा मंत्रालयाने सर्व साखर कारखानदार आणि डिस्टिलरीजना इथेनॉलचे उत्पादन ताबडतोब बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे आता साखर कारखान्यांमध्ये साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.
या निर्णयाबबात ग्राहक व्यवहार आणि अन्न पुरवठा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 नुसार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग विविध जीवनावश्यक वस्तू, विक्री आणि उपलब्धता यावर लक्ष ठेवत असतो. याच अंतर्गत साखरेची किंमत स्थिर रहावी यासाठी सरकारने 2023-24 या काळात साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरींना साखरेच्या रसापासून इथेनॉल बनवू नये असे आदेश दिले आहेत. हा आदेश तात्काळ होत आहे. परंतु तेल विक्री कंपन्यांकडून सध्या मिळालेल्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी बी-हेवी मोलॅसेसपासून इथेनॉलचा पुरवठा सुरु राहणार आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड