धर्माबाद दि.२९. ता.प्र.दत्तात्रय सज्जन : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सिरजखोड येथे लपोस्क्रापी कुटुंब नियोजन (एक टाका) शस्त्रक्रिया कॅम्प चे दि: २८ रोजी आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण २१ महिलांची लपोक्रापी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सर्जन डॉ. संतोष अंगरवार यांनी यशस्वीरित्या ऑपरेशन पार पडले आहे.
सदरील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नसिंमबानो शेख मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार सदरील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.याकामी आरोग्य कर्मचारी सिस्टर शिल्पा चींतलवार, साईंनाथ जिंकले, महेश मराठे,राहुल भगत,कपिल पाटील, ॲम्बुलन्स चालक मारोती बकवाड, दावलबाजे सुनील, नागोराव भंडारे,गोविंद जिंकले,तुकाराम जाधव, संघमित्रा धडे, आशा सेविका सीमा खानापुरे इत्यादी कर्मचारी सदरील कॅम्प यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले आहे.
दि: २९ रोजी सकाळी सर्व रुग्णांची तपासणी करून त्यांना डीचार्ज देण्यात आले आहे या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कॅम्पमध्ये रुग्णांना कोणत्याही प्रकारची आवश्यकता व त्रास न भासुदील्याने त्यांच्या नातेवाईकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड