दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि ७ : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सिरजखोड येथे लपोस्क्रापी कुटुंब नियोजन (एक टाका) शस्त्रक्रिया कॅम्प चे दि: 6 रोजी आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण 35 महिलांची लपोक्रापी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सर्जन डॉ. संतोष अंगरवार यांनी यशस्वीरित्या ऑपरेशन पार पडले आहे.
सदरील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नसिंमबानो शेख व कोन्हेरी मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार सदरील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.याकामी आरोग्य कर्मचारी नामेवर मॅडम व सिस्टर शिल्पा चींतलवार, साईंनाथ जिंकले, महेश मराठे,राहुल भगत,कपिल पाटील, ॲम्बुलन्स चालक मारोती बकवाड, दावलबाजे सुनील, नागोराव भंडारे,गोविंद जिंकले,तुकाराम जाधव, संघमित्रा धडे, आशा सेविका सीमा खानापुरे तसेच आरोग्य सेवक -सेविका इत्यादी कर्मचारी सदरील कॅम्प यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड