नागेश शिंदे
हिमायतनगर दि.२९: नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे दिनांक 26 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधी मध्ये जिल्हा स्तरीय प्रकल्प क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये हिमायतनगर तालुक्यातील शेषराव चंद्रावर राऊत अनुदानित आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन हॉलीबॉल स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले या प्रकल्पात संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या गुणांना वाव दिला या स्पर्धेत हिमायतनगर तालुक्यातील मौजे महादापूर येथील शेषराव चंद्रावर राऊत अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी वयोगट 14 वर्ष ते 17 वर्षे वयोगटातील हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून दोन्ही संघांनी विजय मिळवित त्यामुळे विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी ते पुढे पात्र झाले आहेत त्यामुळे किंनवट येथील सहाय्यक जिल्हा अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी किनवट प्रकल्प कार्यालया मार्फत अनुदानित व विनाअनुदानित आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये असंख्य शाळेंनी सहभाग नोंदविला होता त्यात 14 ते 17 वयोगटातील हॉलीबॉल स्पर्धेत हिमायतनगर तालुक्यातील मौजे महादापूर येथील शेषराव चंद्रावर राऊत या आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून विजय मिळविला या विजयी संघाच्या खेळाडूंचा सत्कार किनवट येथील सहाय्यक जिल्हा अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मेघना कावली मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विजयी संघास संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव राऊत, डॉ. मनोज राऊत, गौतम राऊत,माध्यमिक मुख्याध्यापक वानखेडे सर, प्रा.मु.लोहकरे सर, सह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी उमेदवाराचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड