नांदेड दि.१: जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या विद्यमाने दिनांक ३० जानेवारी २०२४रोजी जिल्हास्तरीय दिव्यांग मुला मुलींच्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन जिल्हा पोलीस अधीक्षक कवायत मैदान येथे करण्यात आले होते. प्रारंभी या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी मा.अभिजीत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जि प मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल,पोलीस अधीक्षक मा.श्रीकृष्ण कोकाटे,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या सचिव दलजीत कौर जज,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मीनगिरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.संदीप माळोदे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा.मुक्कावार उपस्थित होते.
त्यामध्ये सुनित शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड संचलित एस एम निवासी संमिश्र अपंग तांत्रिक प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र बरडशेवाळा ता.हदगाव जि.नांदेड येथील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केली.
16 ते 21 वर्ष वयोगटामध्ये 200 मीटर धावणे (अपंग) स्पर्धेत प्रभाकर अंभोरे हा प्रथम तर शुभम डुबेवार हा तृतीय आला आहे.तसेच 100 मीटर धावणे (अपंग) या ही स्पर्धेत प्रभाकर अंभोरे प्रथम व शुभम डुबेवार हा तृतीय आला आहे. व गोळाफेक स्पर्धेत (अंशत: अंध) सुमित नरवाडे याने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
एस.एम.निवासी कार्यशाळेस २ सुवर्ण पदक,१ रौप्य तर २ कास्य पदक मिळाले आहेत.
या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल जिल्हा समाज कल्याण अधिकारी मा.सतेंद्रकुमार आऊलवार साहेब,संस्थेचे अध्यक्ष श्री.आर.आर. भास्करे व सचिव श्री.पी.आर.भास्करे तसेच कार्यशाळेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड