मुदखेड ता. प्रतिनिधी मोहम्मद हकीम दि.५: नांदेड येथे एकमतचे पत्रकार राहुल गजेंद्र गडकर ३ मार्च २०२४ रोजी वार्ताकनांसाठी जायमोक्यावर जाऊन घटनेचे छायाचित्र काढल्यानंतर ते एकमत कार्यालयाकडे येत असताना, त्यांना रस्त्यात अडून अज्ञान तिघांजणानी धक्काबुक्की करीत, मारहाण करत उपस्थीत नागरिकांनी एकमतचे प्रतिनिधी राहुल गजेंद्र गडकर यांना हल्लेखोरांच्या तावडीतून सोडविले आणि पुन्हा दोघांनी अडविले त्यांचा फोटो काढून त्यांना जीवे मारण्याची धमकी देणांन्या हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करून त्यांच्या विरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात यावी यासाठी आज दिनाक ४ मार्च रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
तहसीलदार यांच्या कार्यालयाकडून नायब तहसिलदार मारोतराव जगताप यांनी निवेदन स्वीकारले यावेळी मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार तथा माजी जिल्हा सचिव संजय कोलते,ज्येष्ठ पत्रकार उत्तम हणमंते,माजी तालुकाध्यक्ष शेख जब्बार,मुदखेड तालुका मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष सिद्धार्थ चौदंते,तालुका सचिव साहेबराव गागलवाड,शहराध्यक्ष अतीख अहमद, शेख शमशोद्दिन, रुकमाजी शिंदे,संतोष दर्शनवाड,धम्मदात कांबळे, कुणाल चौधरी,,शेख इरफान,संतोष सावंत,मोहम्मद हकीम आदींची उपस्थिती होती.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड