कोतवालांना शासकीय सेवेत चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा अशी कोतवाल संघटनेची मागणी
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे दि.12: महाराष्ट्र राज्य कोतवाल कर्मचारी संघटने कडून आज दिनांक 12 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील कोतवालांना शासकीय सेवेत चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा या मागणी करिता महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जो संपूर्ण महाराष्ट्रात बेमुदत संप सुरू केला आहे त्याला हिमायतनगर शहरातील सर्व कोतवाल संघटनेने जाहीर पाठिंबा देऊन हिमायतनगर तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना एक लेखी निवेदन देऊन महसूल कर्मचारी संघटनेच्या बेमुदत संपाला जाहीर पाठिंबा दिला…
या बाबत सविस्तर वृत्त असे की संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या महसूल कर्मचारी संघटनेच्या बेमुदत संपास हिमायतनगर येथील महाराष्ट्र राज्य कोतवाल कर्मचारी संघटना च संलग्नित हिमायतनगर तहसील कार्यालया अंतर्गत कार्यरत असलेल्या सज्जातील कोतवालांनी वरिष्ठाच्या आदेशान्वये तालुक्यात महसूल कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे शिपाई, लिपिक, संवर्गातीलकी कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा या मागणी करिता दिनांक १० जुलैपासून महसूल कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपास हिमायतनगराच्या तालुका कोतवाल संघटनेने जाहीर पाठिंबा देऊन हिमायतनगर तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना एक लेखी निवेदन दिले आहे यावेळी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे तालुका अध्यक्ष हरीश प्रसाद गिरी, उपाध्यक्ष गजानन आडे ,सचिव विशाल सावते, कोषाध्यक्ष आनंद चेनेरेल्लू, विकास तुळसे, भीमराव जाधव, दिपाली अंनगुलवार, संगीता भुरेवाड, धनश्री रिंगणमोडे, योगेश आलेवाड ,माधव नाव्हेकर, लक्ष्मण जाधव ,अस्मिता घुमणर सह आदी जन उपस्थित होते….
#सत्यप्रभा न्युज #नांदेड #हिमायतनगर