मुदखेड ता.प्र.दि.२१: भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त मुदखेड शहरातील भीम नगर येथील बौद्ध विहार येथे दि २० मार्च २०२४ रोजी भीम जयंती मंडळाची कार्यकारणी बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस बौद्ध उपासक नवयुवक यांच्या उपस्थितीत सर्वांना मते भीम नगर भीम जयंती मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.या मध्ये भीम जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी मनोज कुमार कांबळे, उपाध्यक्ष अमोल चौदंते, सचिव सौरभ चौदंते, कोषाध्यक्ष जनार्दन क्षीरसागर, सहसचिव रोहन कांबळे यांची निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल सर्व नवनिर्वाचित भीम जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी भीम नगर येथील बौद्ध उपासक व नवयुवकांची उपस्थिती होती.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड