नाशिक, पुणे, छ.संभाजीनगर च्या धर्तीवर नांदेड येथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध
नांदेड दि.२४: शहरातील दत्तनगर भागातील डॉ. शिल्पा संतोष बोमनाळे (सोलापूरे) यांच्या अंश फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा शुभारंभ सोहळा रविवार दि.२३ फ्रेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.या सोहळ्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खा.अशोकराव चव्हाण, नांदेड लोकसभा मतदार संघाचे खासदार रवींद्र चव्हाण, खा.अजित गोपछडे, आ.प्रतापराव पाटील चिखलीकर,आ.तुषार राठोड,आमदार बालाजीराव कल्याणकर, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थित होती.

यावेळी श्री श्री श्री १००८ जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामी केदार पीठ यांच्या हस्ते डॉ. शिल्पा संतोष बोमनाळे (सोलापूरे) यांच्या अंश फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.आयोजित सोहळ्यात उपस्थित प्रमुख मान्यवर व गुरुवर्य यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
उद्घाटन सोहळ्यासाठी श्री 108 ष.ब्र.दिगंबर शिवाचार्य महाराज ( वसमतकर ),श्री 108 ष.ब्र.विरूपाक्ष शिवाचार्य महाराज , श्री 108 ष.ब्र.सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज ,सद्गुरू शिवलिंगप्पा गुरू महाराज यांच्या सह गुरुवर्य यांची उपस्थिती होती.यावेळी गुरुवर्य व प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर गुरुवर्य प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत डॉक्टर शिल्पा संतोष बोमनाळे यांना शुभेच्छा दिल्याया सोहळ्यासाठी बोमनाळे परिवारासह आप्त , मित्रमंडळी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती..
अंश फर्टीलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा अनेक निःसंतान दाम्पत्यांना लाभ …
अंश फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या स्थापनेमुळे अनेक निःसंतान दाम्पत्यांना लाभ होणार असल्याची माहीती संचालिका डॉ.सौ.शिल्पा संतोष बोमनाळे यांनी दिली.
पुढे त्या म्हणाल्या की अंश फर्टीलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर येथे महिलेच्या गर्भाशयाचे अस्तर, ओव्यूलेशन, फॅलोपियन ट्यूब ची स्थिती, स्त्रीबीज आणि शुक्राणूंची गुणवत्ता, इतर आजार, मिसकॅरेज चा इतिहास असा सर्व प्रकारे डिटेल स्टडी केला जातो आणि त्यानंतरच आयव्हीएफ ची गरज आहे का आणि कोणत्या प्रकारच्या आयव्हीएफ ची गरज आहे हे ठरवून आयव्हीएफ केले जाते
तसेच आजरोजी मुंबई,पुणे,छ.संभाजीनगर या मोठ्या शहरांच्या धर्तीवर अद्यावत आणि अत्याधुनिक सुविधा आपल्या अंश फर्टीलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर येथे उपलब्ध असणार आहेत असे त्यांनी सांगितले आहे .
#सत्यप्रभा न्युज #नांदेड