आमदार राजेश पवार यांचा ऐतिहासिक उपक्रम चालूच
धर्माबाद ता.प्र. दत्तात्रय सज्जन दि.२८: आमदार राजेश पवार यांचा नेत्र तपासणी व चष्मे वाटपाचा ऐतिहासिक उपक्रम गेल्या दोन वर्षापासून चालूच असून आजतागायत धर्माबाद तालुक्यासह अख्या नायगाव विधानसभा मतदारसंघात तब्बल २६ हजारांच्या वर नेत्र रुग्णांची तपासणी करून तेवढ्याच चष्म्याचे वाटपही त्यांनी स्वखर्चातून केले आहे, एवढेच नाही तर नेत्ररोग तपासणी मध्ये मोतीबिंदू व इतर डोळ्यांच्या शस्त्रक्रियाही त्यांनी स्वतःच्या खर्चाने रुग्णालयात करावयास लावत आहेत.
आमदार राजेश पवार यांच्या डोक्यात एखादी स्तुत्य कल्पना आलीकी ती पूर्ण करण्याचे कसब व हातखंडा याबाबत त्यांची ख्याती अख्या नायगाव विधानसभा मतदारसंघात पसरली आहे! मागच्या दोन वर्षापासून हा स्तुत्य उपक्रम चालू असला तरी मागील काळात कोरोना ही वैश्विक महामारी, आचारसंहिता, नंतर मराठा आरक्षण आदी गोष्टीमुळे थोडा खंड पडत हा कार्यक्रम चालत असला तरी गेल्या तीन महिन्यापासून मात्र सदरील कार्यक्रमाने सातत्यपूर्ण हजेरी आपल्या मतदार संघात लावली आहे.
नेत्र तपासणी सारखा किचकट व चिवट विषयही अगदी सूक्ष्म नियोजनाद्वारे आमदार राजेश पवार व त्यांच्या पत्नी सौ पुनमताई पवार ह्या यशस्वीरित्या हाताळत आहेत .
उपरोक्त पार्श्वभूमीवर हा ऐतिहासिक उपक्रम महाराष्ट्रातच नव्हे तर अख्या देशातच पहिल्यांदा राबवला जात असल्याचे वृत्त असून अनेक सर्वेक्षण करणाऱ्या प्रायव्हेट व शासकीय कंपन्यांनी या ऐतिहासिक उपक्रमाची नोंद घेतली आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड