राज्य रस्ता सुरक्षा अभियानास नांदेड जिल्हयात सुरुवात
नांदेड़ दि.३ : निष्णात फलंदाज सचिन तेंडुलकर फिरकी गोलंदाजीवरही हेल्मेट घालून का खेळतो ?याचे उत्तर ज्याला कळले त्याला रस्तासुरक्षेचे मर्म कळले.त्यामुळे रस्त्यावर अतिआत्मविश्वास न दाखवणे, नियमांचे काटेकोर पालन करणे, हेल्मेट लावणे, सीट बेल्ट लावणे, मोबाईल न वापरणे,फुटपाथवर पायी चालताना कायम रस्त्याच्या उजव्या बाजूला वाहनांकडे तोंड करून चालणे, महत्त्वाचे ठरते. असे केल्यास प्रत्येक अपघात टाळल्या जाऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज केले.
१ जानेवारी ते ३१ जानेवारी पर्यंत परिवहन विभागामार्फत राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२५ राबविण्यात येणार असून, त्याकरिता ‘पर्वा ‘ अर्थात इंग्रजी मधील केअर ही थीम घोषीत करण्यात आली आहे. सदर अभियानाचे उद्घाटन ०३ जानेवारी रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड येथे अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रथम दिपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सुरवात करण्यात आली. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून.अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड, डॉ. महेश कुमार डोईफोडे, आयुक्त, नांदेड-वाघाळा मनपा, श्रीमती दलजितकौर जज, सचिव नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, .बि.सी.पांढरे, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड इतर शासकीय विभागाचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात संदिप निमसे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (अ.का), नांदेड यांनी रस्ता सुरक्षा अभियाना मागचा उद्देश व विभागाची भूमिका मांडली. विभागातर्फे राबविण्यात येणा-या अंमलबजावणी (Enforsment) मुळे व भविष्यातील तंत्रज्ञानाने अपघात कमी करण्याबाबत तसेच सदर अभियान अंतर्गत पूर्ण महिनाभर परिवहन विभाग विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी यांनी उपिस्थतांना वाढते अपघात कमी करण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पायी चालणाऱ्यांनी कायम रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे अर्थात फूटपात वरून वाहनाकडे तोंड करून पायी चालण्याची पद्धत अवलंबावी (Walk on Right ) या बाबीचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले. ओव्हर कॉन्फीडन्स मध्ये वाहन चालविणे, मोबाईल टॉकीग, तसेच छोटया छोटया चुकामुळे अपघात होत असल्यामुळे त्या चुका होऊ न दिल्यास अपघात थांबतील. वाहनांना, सायकली, बैलगाडींना रिफलेक्टर लावण्यानंतरच वाहने चालविण्याबाबत सुचना दिल्या. तसेच सहा साखर कारखान्यांमध्ये वाहतूक करताना वाहतूकदारांनी रिफ्लेक्टर लावूनच उसाची वाहतूक करण्याचे आवाहन केले. या वर्षाच्या ‘पर्वा ‘ संकल्पनेची थिम असल्याबाबत सांगितले. रस्ता सुरक्षा समिती सर्व यंत्रणा सदर अभियान जिल्हाभर राबवून अपघात मुक्त नांदेड करण्याचे संकल्पना मांडण्यात आली.श्रीमती दलजितकौर जज, यांनी रस्ता सुरक्षा करिता वाहतुक नियमांचे पालन करणे व दूचाकी चालविताना हेल्मेटचे वापर करण्याबाबतचे मत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी.पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते आपल्या प्रिय व्यक्तीकरिता Parwah – care (संदेश फलकाचे) रस्ता सुरक्षा कार्यक्रमाच्या वेळी उदघाटन करण्यात आले.उपस्थितांना वाहतूक चिन्हे, रस्ता सुरक्षा चिन्हे याबाबत अधिकारी यांनी प्रत्यक्ष व भिंती पत्रकाद्वारे रांगोळी द्वारे मार्गदर्शन केले तसेच प्रथमोपचार व अपघातांनंतर घ्यावयाची काळजी बाबत डॉ. कुलकर्णी, डॉ. गुटे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती रेणुका राठोड यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती अनुराधा पतकी यांनी केले. या प्रसंगी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड येथे कार्यरत अधिकारी व कर्मचारी, तसेच सुमारे २०० एनसीसी कैडेट, वाहन वितरक प्रतिनिधी फरांदे, श्री. कोठारी, जाधव, . राठी, मोटार वाहन चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष . हुंदल, तसेच ऑटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष . नरेंद्र गायकवाड, अहेमद बाबा, स्कुलबस संघटनाचे अध्यक्ष निखिल लातूरकर, . मनाळकर मोटार ड्रायव्हींग स्कूलचे संचालक . जयवंत पवळे, .धुळे, मस्के व जनसमुदाय उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी . समीर शेख, प्रशांत कंकरेज, मोटार वाहन निरिक्षक . अनुश्री केंद्रे, किशोर भोसले, . राघवेंद्र पाटील, गणेश तपकिरे कार्यालयातील सर्व सहा. मोटार वाहन निरिक्षक, कर्मचारी गजानन शिंदे व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कोरोना आजारापेक्षा अपघातात मृत्यूमुखी
कोरोना आजारापेक्षा अपघातात मृत्यूमुखी
श्रीमती दलजितकौर जज यांनी देशातील अपघातात मृत्यु पडलेल्या व्यक्तीची संख्या पाहिली असता ती संख्या ही मागिल काही कालावधीमध्ये कोरोना या महाभयंकर बिमारीपेक्षाही अधिक असल्यामुळे रस्त्यावर वाहन चालवितांना सर्वानी वाहतूक नियमाचे पालन करुन वाहने चालविण्याबाबत सुचना दिल्या.
नांदेडमध्ये वर्षभरात ३९४ अपघाती मृत्यू
जोपर्यंत एखादी घटना आपल्या घरात घडत नाही तोपर्यंत त्याचे गांभीर्य कळत नाही. नांदेड मध्ये गेल्या वर्षभरात झालेल्या अपघाती मृत्यूची संख्या ३९४आहे. आणखी एक ज्यांचा काही दोष नाही अशा पायी चालणाऱ्या ६४ जणांना वाहनांनी चिरडले आहे. ३६५ दिवसात ३९४अधिक ६४ एकूण ४५८ लोकांचा जीव बेदर्कारपणे चालणाऱ्या वाहनांनी एकट्या नांदेड जिल्ह्यात घेतला आहे.
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड