हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-शहरातील कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेमुळे ज्येष्ठ नागरिकांन सह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे उमर चौक कमान लगत असलेले दुकान व पळसपुर पॉइंट येथील रस्त्यावरील अतिक्रमण नगर पंचायत प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने रस्त्यावरील अतिक्रमण दि 7 नोव्हेंबर रोजी हटविले
या बाबत सविस्तर वृत्त असे की शहरात येणारे विद्यार्थी तसेच राजा भगीरथ शाळा,हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय कॉलेज मध्ये येणाऱ्या ५ हजार हुन अधिक विद्यार्थ्यांना ट्रॅफिक चा नाहक त्रासाचा सामना करावा लागत होता. तसेच नागरिकांना पायी चालण्याकरीता देखिल अडथळे निर्माण होत होते त्यामुळे याच पार्श्वभूमीवर कोलमडलेल्या वाहतुकीमुळे शहरात सतत ची होणारी कोंडी वाहतूकव्यवस्थेला शिस्त लावावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा अनेकांनी उपविभागीय अधिकारी हदगाव यांना निवेदनाद्वारे दिला होता. या अनुषंगाने नायब तहसीलदार तथा नगर पंचायत प्रशासक ताडेवाड,महाजन साहेब व पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनुर, नंदलाल चौधरी यांनी दि 7 नोव्हेंबर रोजी शहरातील उमर चौक येथील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर थेट जे सी.बी. चालवून तेथील रस्ते मोकळे केले आहेत शहरातील वाढत्या लोकसंख्येचा परिणाम वाहतूकव्यवस्थेवर दिसून येत होता.शहरातील बेशिस्त वाहनधारक, वाहतूक व्यवस्था कोलमडुन अतिक्रमण करत होते अवैध अवजड वाहने निर्माण होत आहेत. पाच हजारांहून अधिक विद्याथीसंख्या असलेल्या हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्यालयात ये जा करताना आपला जीव मुठीत धरून शिक्षणाचे धडे घ्यावे लागत होते. बेशिस्त वाहतूक व्यवस्थेमुळे या मार्गावर सतत अपघातांची मालिका सुरूच असते यातुन अनेकांना अपंगत्व आले तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला असल्याने या प्रकरणी वारंवार पोलीस प्रशासन व नगर पंचायत प्रशासनास अर्ज, विनंती केली होती शहरातील विद्यार्थ्यांसह नागरीकांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडविण्याकरीता या प्रकरणी त्वरित उपाययोजना करून शहरातील मुख्य रस्त्यावरील व चौका चौकातील रस्ता रुंदीकरण करून रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याची मोहीम नगरपंचायत प्रशासनाने हाती घेतली आहे त्यामुळे हिमायतनगर शहरातील सुजाण नागरिकांना मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणा पासून लवकरच सुटका मिळणार असल्याची भावना व्यक्त केली आहे….