नांदेड दि. २० : अबिनाशकुमार पोलीस अधिक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत जिवनावश्यक वस्तु कायदयानुसार कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले होते.
त्या अनुशंगाने दिनांक १० संष्टेबर रोजी मा. पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशन नायगांव हद्दित पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरुन नांदेड ते नायगांव जाणा-या तहसिल कार्यालय नायगांव जवळ एक आयचर वाहन क्रमांक महा 26 बीडी ८५१० थांबवून सदरचे वाहन चेक केले असता नमुद वाहनात तांदुळ व गव्हाने भरलेले ८० कटटे, किंमत अंदाजे १,१०,०००/- रु चा रेशनचा संशयित माल मिळुन आला. तसेच महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक महा २६ बीई ४२४६ थांबवुन चेक केले असता त्यामध्ये तांदळाने भरलेले ६० कटटे किं.अं. ७५,०० /- रुपयाचा माल व दोन्ही वाहनांची मिळुन किं.अं. २३,००,००/- रु असा एकूण २४,८५ ,०००/- रुपयांचा संशयित माल मिळुन आल्याने दोन्ही वाहने ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन नायगांव येथे लावण्यात आले आहे. सदर प्रकरणी पुरवठा विभागाचा अहवाल मागवुन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याची तजविज ठेवली आहे.
सदरची कामगिरी मा.श्री. अबिनाशकुमार पोलीस अधिक्षक नांदेड, मा.श्री. सुरज गुरव अपर पोलीस अधीक्षक नांदेड, मा.श्री. खंडेराव धरणे अपर पोलीस अधिक्षक भोकर, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सहा. पोलीस निरीक्षक व्ही.एस. आरसेवार, पोह/६०५ पोतदार, पोह/३३५ मुंढकर, पोना/५८० तलवारे, पोकॉ/२८६४ येंगाले, पोकों/२६१४वाघमारे यांनी पार पाडली. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड