नांदेड दि.७: नांदेड जिल्हयातील सर्व नागरिकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, नांदेड शहर व परिसरातील काही गुंड प्रवृत्तीचे लोक हे जिल्हयातील गोरगरीब व असहाय्य लोकांची मोक्याच्या ठिकाणी असलेली जमिन, स्थावर मालमत्ता बळजबरीने कब्जा करून ती मिळवणे व अनाधिकृतपणे सावकारी व्यवसाय करून सामान्य लोकांना वेठीस धरणे यासारखे अपराध करत असल्याचे निदर्शनास आले असून अशा गंभीर प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून प्रभावी कार्यवाही करण्यात येत आहे. गूंड प्रवृत्तीच्या लोकांकडून अशा प्रकारे जमिन, स्थावर मालमत्ता कब्जा किंवा अवैद्य सावकारी व्यवसाय होत असल्यास नागरीकांनी त्वरीत पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड